अनिल देशमुख प्रकरणात EDने नोंदवला परमबीर सिंग यांचा जबाब

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप परमबीर सिंह (parambir Singh) यांनी केला होता. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
 Anil Deshmukh, Parambir Singh
Anil Deshmukh, Parambir Singh sarkarnama

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने तीन नोव्हेंबर रोजी अटक केली होती. देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या Money Laundering प्रकरणात ईडीने (ED) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir Singh) यांचा जबाब नोंदवला आहे.

अनिल देशमुखाना ईडीनं चैाकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी पाच वेळा समन्स बजावले होते. पण देशमुख या पाचही वेळी उपस्थित राहिले नाही. ते दोन नोव्हेंबर रोजी ईडी कार्यालयात उपस्थित होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप परमबीर सिंह (parambir Singh) यांनी केला होता. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची चैाकशी सीबीआय (cbi) करीत आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर ईडीने यात देशमुखांविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ईडीने याआधीच अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना यांना अटक केली आहे. याचसोबत अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेशचीही ईडीने चैाकशी केली आहे.

 Anil Deshmukh, Parambir Singh
परमबीर सिंह, सचिन वाझेवर दीड हजार पानाचं पहिलं दोषारोपपत्र दाखल

आयुक्त परमबीर सिंह (parambir Singh) आणि त्यांचा सहकारी निलंबीत सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे (sachin waze) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गोरेगाव येथील कथित खंडणी प्रकरणात परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासह एकूण ६ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसापूर्वी परमबीर यांना न्यायालयाने फरार घोषित केल्यावर ते अचानक मुंबईत येऊन दाखल झाले. त्यानंतर त्यांचा या प्रकरणात जबाब नोंदवण्यात आला होता. १ हजार ८९५ पानांचे दोषारोपपत्र किल्ला कोर्टात दाखल करण्यात आले आहे. तब्बल २३१ दिवसांनंतर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. या प्रकरणाची चैाकशी चांदीवाल समिती करीत आहे. गेल्या आठवड्यात वाझे, परमबीर सिंह हे समोरासमोर आले होते.

परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंत एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ३ खंडणीचे गुन्हे तर एक अ‍ॅट्रॉसिटी आणि अधिकार्‍यांना धमकावले असल्याचा गुन्हा आहे. गोरेगाव खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. ५ आरोपींपैकी परमबीर सिंह, सचिन वाझे, रियाझ भाटी, विनय सिंग, अल्पेश आणि चिंटू हे आरोपी आहेत. सचिन वाझे, परमबीर सिंह, अल्पेश आणि चिंटू यांच्याविरोधात या प्रकरणातील पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com