Disqualification of 16 MLAs : प्रत्येक आमदाराचे सहा हजार पानांचे उत्तर, आमचाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा केला दावा !

Shivsena : गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेना पक्षात मोठी फूट पडली.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Maharashtra Political News : १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकालाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. सहा हजार पानांचे उत्तर प्रत्येक आमदाराने पाठविले असून त्यात आमचा पक्ष हाच मूळ शिवसेना आहे. तसेच आमच्या पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा केला आहे. आम्ही स्वतःहून पक्ष सोडलेला नाही, असा दावा या सोळा आमदारांनी या उत्तरात केला आहे. (The claim has been made by sixteen MLAs in this reply)

या उत्तरासोबत सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत पक्षासंबंधात दिलेला निकाल आणि त्याची प्रत जोडली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी यांची शिवसेना आणि ठाकरे यांची शिवसेना यांनी एकमेकांच्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे केलेल्या याचिकांची सुनावणी सुरू असून अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या पाठविलेल्या नोटिशीला या आमदारांनी उत्तर पाठविले आहे.

आमदार अपात्रतेच्या कारवाईस आता वेग येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे पाठविलेल्या उत्तरात आमचा पक्ष हाच मूळ शिवसेना असून आमच्या पक्षात कोणतीही फूट पडलेली नसल्याचा दावा केला आहे. शिवसेनेतील ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री बनले.

त्यानंतर दोन्ही गटांनी दावे प्रतिदावे करीत एकमेकांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेसंबंधी याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवरील सुनावणीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरुवात केली असून सुनावणीचा भाग म्हणून दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस दिली होती. त्या नोटिशीला शिंदे गटाच्या आमदारांनी पंधरा दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या नोटिशीला उत्तर पाठविले आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde On Chandrayaan-3 Landing : चांद्रयान- ३ मोहीम फत्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडताना कायदेशीर पुरावा म्हणून आमचा पक्ष हाच मूळ पक्ष असल्याच्या दाव्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असल्याचे यात म्हटले आहे. अन्य कायदेशीर बाबी हे आमदार प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळेस सादर करणार आहेत, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

या आमदारांच्या लेखी उत्तराची मांडणी विधिमंडळ सचिवालय करणार असून त्यानंतरच सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाच्या आमदारांची उत्तरे लवकरच सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. मात्र या सर्व उत्तरांचा अभ्यास करणे ही अतिशय वेळखाऊ प्रक्रिया असल्याने निकालास आणखी विलंब लागण्याची शक्यता असल्याचे विधिमंडळातील सूत्रांनी सांगितले.

Eknath Shinde
Dada Bhuse On Shivsena Split: शिवसेना का आणि कुणामुळे फुटली?; दादा भुसेंनी सांगितले खरे कारण...

सर्वोच्च न्यायालयाने सुयोग्य वेळेत सुनावणी घेऊन निकाल देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्वांची बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याने परिच्छेद १० नुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. पर्यायाने अध्यक्षांना घाई घाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही. असेही विधिमंडळातील सूत्रांचे म्हणणे आहे.

निवडणूक आयोगाने काय निकाल दिला होता?

शिवसेना (Shivsena) हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार, यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर (Election Commission) प्रदीर्घ सुनावणी झाली होती. निवडणूक आयोगाने १८ फेब्रुवारी २०२३ रोजी याप्रकरणी निकाल दिला. आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे (Eknath Shinde) गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in