
Mumbai : काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. राहुल गांधींच्या एका रॅलीचा हा व्हिडिओ आहे. यात जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, या व्हिडीओसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरचं गाणं वापरण्यात आलं आहे. त्यामुळे नवा राजकीय वाद पेटला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते पदयात्रा करत जनतेशी संवाद साधत आहेत. पण या व्हिडीओसोबत छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)च्या शौर्यगाथेवरचं गाणं लावलं आहे. त्यावर भाजपनं आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला असून काँग्रेसनं तो व्हिडीओ डिलीट करावा आणि देशाची माफी अन्यथा भाजपा काँग्रेसविरोधात आंदोलन करेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
काँग्रेसनं ट्विट केलेल्या या व्हिडिओवर भाजपनं आक्षेप घेतलाय. व्हिडिओ तातडीनं डिलीट करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शिवाय काँग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी असंही भाजपनं म्हटलंय. त्यामुळे आता या व्हिडिओवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
पटोलेंचं प्रत्युत्तर...
काँग्रेस नेते राहुल गांधीं(Rahul Gandhi)च्या एका व्हिडीओवरुन भाजप आक्रमक झाली आहे. राहुल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, काँग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
पटोले म्हणाले, व्हिडीओचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. पण ज्यावेळी भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा गप्प का बसला होतात असा प्रतिसवालही पटोलेंनी बावनकुळेंना विचारला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.