फडणवीस पुन्हा नाराज! नाशिकमध्ये असूनही साहित्य संमेलनाला जाणार नाहीत...

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या नाशिकमध्ये पार पडत आहे.
Devendra Fadanavis
Devendra Fadanavis Sarkarnama

नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या नाशिकमध्ये पार पडत आहे. मात्र या संमेलनाला उपस्थित न राहण्याची घोषणा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. सुरुवातीला नाशिकच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना संमलेनाचे निमंत्रण नसल्याने नाराजीचे नाट्य सुरू झाले होते. त्यानंतर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यानुसार दोघांनीही विनंती मान्य केल्याचा दावा भुजबळ यांच्याकडून करण्यात आला होता.

मात्र त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दूसऱ्या कारणासाठी नाराज असून यामुळे त्यांनी संमेलनाला उपस्थित न राहण्याची घोषणा केली आहे. विषेश म्हणजे ते दूपारनंतर आज नाशिकमध्येच असणार आहेत. आज त्यांनी ट्विट करुन आपण संमेलनाला जाणार नसल्याचे घोषित केले आहे. पण साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे साहित्य संमेलनात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

Devendra Fadanavis
बच्चू कडू वादात : बोगस कागदपत्र आणि कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल

आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव!

Devendra Fadanavis
३ दिवसात ३ मंत्री : पुणे जिल्हा बँकेसाठी वळसे-पाटलांचा अर्ज दाखल

या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण, जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाला जाणार नसल्याचे घोषित केले आहे.

फडणवीस-पाटील आज नाशिकमध्ये

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील १३ नगरपंचायतींची निवडणूक येत्या २१ डिसेंबरला होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दुपारी ४ पासून पंचवटीतील स्वामिनारायण बॅन्क्वेट हॉलमध्ये तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर फडण‌वीस व पाटील सातपूरचे दिवंगत मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या निवासस्थानी भेट देतील असा साधारण कार्यक्रम आहे. त्यामुळे भाजपचे दोघेही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये असतानाही संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com