`चंद्रकांतदादांकडे लक्ष देण्याची गरज नाही.. पण फडणवीसही उथळ झालेत`

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे भाजप नेत्यांना टोले
शरद पवार-फडणवीस
शरद पवार-फडणवीसSarkarnama

नागपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली असून सत्ता गेल्यानंतर ते इतके अस्वस्थ झाल्याचे पाहून आश्चर्य वाटते, असा टोला त्यांनी लगावला.

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप नेत्यांच्या विधानाचा समाचार घेतला. महाराष्ट्रातील काही शहरांत दंगलीच्या विषयावरून फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टिकेबद्दल विचारले असता पवार यांनी शालजोडीतील लगावले. महाविकास आघाडीने मतांच्या धुवीकरणासाठी या दंगली भडकविल्या असा आरोप भाजपने केला होता.

या वर पवार म्हणाले की चंद्रकांत पाटील बोलले ते काही फार मनावर घेण्यासारखे काही नाही. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांचे मला आश्चर्य वाटते. संवेदनशील विषयांवर बोलताना जबाबदारीने बोलण्याची गरज असते. माझा या पूर्वी समज होता की ते गांभीर्याने मते व्यक्त करतात. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांतील त्यांची मते ऐकली. ती अतिशय उथळपणाची होती. कोणत्याही संवेदनशील प्रश्नावर बोलताना निवडणुकीतील मुद्दे लक्षात घेऊन बोलण्याचे टाळावे लागते. मला माहिती आहे की सत्ता गेल्यानंतर माणसे अस्वस्थ होतात. मात्र ती अस्वस्थता इतक्याही टोकाला जाऊ नये की त्यातून वास्तवतेचे भान सुटावे.

शरद पवार-फडणवीस
अमरावती : नमुना गल्लीमध्ये एका गटाने काढली शस्त्र, तर दुसऱ्या गटाची दगडफेक

दंगलीबद्दल बोलताना ते म्हणाले की दंगलीत कुणाचा हात आहे, याबाबत पाठवलेल्या अहवालाबाबत काही माहिती नाही. हिंसाचाराबाबत स्पेसिफिक बोलणं गरजेचं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दंगलग्रस्त भागात जाव, अशी विनंती मी त्यांना केली होती. त्रिपुरात जे घडले त्याची प्रतिक्रिया इकडे उमटण्याची गरज नव्हती. निवडणुकीत फायदा घेण्यासाठी काही लोकांनी दंगलीचा फायदा घेतला, अशी माहिती आहे याच्या खोलात जाण्याची गरज आहे.

रजा अकादमीवर बंदीबाबत विचारले असता त्यांनी या संघटनेची सर्व माहिती घेवून पुढील बाबी ठरवायला हव्यात असा सल्ला दिला. अभिनेत्री कंगना हिने गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांबद्दल बोलताना त्यांनी अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष केलेले चांगले, असे म्हणत त्यावर मत व्यक्त केले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com