Budget : सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी फडणवीसांचे खडे बोल तर अजितदादांची सूचना; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित
Devendra Fadnavis and
Devendra Fadnavis and Sarkarnama

Budget Session 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरूवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार असून 9 मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Devendra Fadnavis and
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचा निर्धार मेळाव्यात शिंदे सरकारवर जोरदार 'बॅटिंग'

गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले. अनेक वेळा कामकाज तहकुब करावं लागलं होतं. सभागृहात अनेक वेळा सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होतात.

Devendra Fadnavis and
Latur News : फडणवीसांच्या आशीर्वादाने पवार-चौगुलेंनी ‘किल्लारी’चे शिवधनुष्य पेलले; पण...

याच पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सभागृहात शिस्तीचे खडे बोल सुनावले. तर दुसरीकडे सभागृहाचे कामकाज शिस्तीत आणि नियमात चालवावे यासाठी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सूचना केली. मात्र, तरी देखील काहीसे आरोप-प्रत्यारोप सभागृहात पाहायला मिळाले.

Devendra Fadnavis and
Ambadas Danve News : `आप` चे दोन मुख्यमंत्री ठाकरेंना भेटले, त्याचा तर हा जळफळाट नाही ना ?

दरम्यान, विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. उद्या सकाळी ११ वाजल्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होणार आहे. त्यामुळे उद्या देखील सभागृहात काय-काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in