Patole Vs Thackeray: जगतापांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे आघाडीत वादाची ठिणगी; पटोलेंचा ठाकरेंना थेट इशारा; म्हणाले...

Mahad Politics : '' उध्दव ठाकरेंना आम्ही असं करु नका हे सुचवलं होतं. पण...''
Patole Vs Thackeray
Patole Vs ThackeraySarkarnama

Nana Patole News: महाड मतदारसंघ हा शिवसेना (शिंदे गट) प्रतोद आमदार भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असल्यानं त्यांची राजकीय कोंडी करण्याची रणनीती उद्धव ठाकरे गटाकडून सुरू आहे. माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आणि महाडचं नगराध्यक्षपद भूषविलेल्या काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे आता गोगावलेंसमोर तगडं आव्हान उभं करण्याच्या ठाकरे गटाच्या प्रयत्नांना मोठी ताकद मिळाली आहे. पण आता जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या महाड येथील सभेदरम्यान स्नेहल जगताप यांनी हाती शिवबंधन बांधलं. यावेळी त्यांच्यावर ठाकरे गटाकडून एक महत्वाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली. ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते अनंत गिते यांनी महाडचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याचं जाहीर केलं.मात्र, आता जगताप यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Patole Vs Thackeray
PM Modi Campaign in Karnataka : कर्नाटकच्या आखाड्यात आता मोदींची एन्ट्री ; ६ दिवसात १५ रॅली..

नाना पटोले(Nana Patole) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावरुन उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. पटोले म्हणाले, उध्दव ठाकरेंना आम्ही असं करु नका हे सुचवलं होतं. पण तरीदेखील त्यांनी स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. अशाप्रकारे महाविकास आघाडीच्या पक्षाला कमजोर करण्याचं काम जर होत असेल तर ते चुकीचं आहे. ज्यावेळी आघाडीची बैठक होईल त्यात आम्ही हा जगताप यांच्या पक्षप्रवेशाचा मुद्दा नक्की उपस्थित करणार आहोत. ही जागा काँग्रेसची आहे आणि या जागेवर पक्ष उमेदवार उभा करणार आणि निवडणूक लढणार असा इशाराही पटोलेंनी यावेळी दिला.

स्नेहल जगताप, काँग्रेसचे (Congress)जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जगताप व महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे महाड मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर महाड मतदारसंघात ठाकरे गटाची कोंडी झाली होती. मात्र, जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे गोगावले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील अनेक आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत.

Patole Vs Thackeray
Chhatrapati Sambhajinagar News: आता बोला! सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाच चोरट्यांचा दणका; पाच लाख किंमतीची...

जगताप काय म्हणाल्या?

स्नेहल जगताप(Snehal Jagtap) यावेळी म्हणाल्या, " महाड, पोलादपूर, माणगावच्या जनेतेने सातत्याने शिवसेनेवर प्रेम केलं. तब्बल सहा वेळा या पक्षाचे आमदार निवडून आले. आज या सभेच्या निमित्ताने या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल ही ग्वाही देण्यासाठी मी आणि माझे सहकारी येथे उपस्थित आहेत, असा निश्चयही त्यांनी बोलून दाखवला.

Patole Vs Thackeray
Rajasthan Politics : भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी वाचवलं होते आमचं सरकार ; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट, व्हिडिओ पाहा

माझ्या कुटुंबियांसह आणि हितचिंतकांसह आम्ही ठाकरे गटात प्रवेश करत आहोत. आज या सभेच्या निमित्तानं सांगते की या मतदारसंघात केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल. या मतदारसंघातील जनतेनं आता ठरवलं आहे. या शहरानं मला नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. निवडणुकांदरम्यान दिलेल्या आश्वासानानुसार मी ९० टक्के कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे"

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com