Congress : `कुठे नेऊन ठेवलायं महाराष्ट्र माझा`ला, कुठे नेऊन ठेवलाय देश माझा`, ने प्रत्युत्तर..

भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पेट्रोल-१२१ रूपये, डिझेल-१०५, सीएनजी-७२, गॅस-९५०. `कुठे नेऊन ठेवला आहे देश माझा`, असा टोला लगावला. (Congress)
Congress : `कुठे नेऊन ठेवलायं महाराष्ट्र माझा`ला, कुठे नेऊन ठेवलाय देश माझा`, ने प्रत्युत्तर..
Congress Leader Bhai Jagtap- Amrita FadanvisSarkarnama

मुंबई : हनुमान चालीसा पठणाच्या मुद्यावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी मुंबईत मातोश्रीसमोर जाण्याचा प्रयत्न केला. यातून शिवसैनिक विरुद्ध राणा असा संघर्ष झडला. (Bjp) राणा दांम्पत्याच्या अटकेनेतर भाजपचे नेते किरीट सोमय्या खार पोलिस स्टेशनमध्ये त्यांना भेटायला गेल तर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला.

यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले, त्यात अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचणारे ट्विट केले. ` कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा`, असे म्हणत त्यांनी शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. (Congress) यावरुन सोशल मिडियावर दोन्ही बांजूनी आरोप-प्रत्यारोप देखील झाले.

फडणवीस यांच्या ट्विटला आता काॅंग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra) काॅंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी देशात वाढलेल्या पेट्रोल-डिझेल, गॅस व सीएनजीच्या किंमतींकडे बोट दाखवत `कुठे नेऊन ठेवलाय देश माझा`, असा टोला भाजपला लगावला आहे.

भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पेट्रोल-१२१ रूपये, डिझेल-१०५, सीएनजी-७२, गॅस-९५०. `कुठे नेऊन ठेवला आहे देश माझा`, असा टोला लगावत जगताप यांनी अमृता फडणवीसांच्या ट्विटला उत्तर दिले आहे.

Congress Leader Bhai Jagtap- Amrita Fadanvis
हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का ?

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीकडून केला जातोय. तर देशातील वाढत्या महागाईवरून देखील राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून टीका करतांना दिसत आहे.

या आरोप-प्रत्यारोपांमध्ये उडी घेत अमृता फडणवीस यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य करणारे खोचक ट्विट केले होते. त्याला काॅंग्रेसच्या भाई जगताप यांनी जशास तसे उत्तर देत भाजपला महागाईच्या मुद्यावरून टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.