Balu Dhanorkar Passed Away : अखेर मृत्यूशी झुंज अपयशी; काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं निधन

Balu Dhanorkar : लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते.
Balu Dhanorkar
Balu DhanorkarSarkarnama

Chandrapur : चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात वयाच्या ४७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर काही दिवसांपासून पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्यानं उपचार सुरु होते. धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्यावर मागील तीन दिवसांपासून खासदार धानोरकरांवर (Balu Dhanorkar) उपचार सुरू होते. त्यांना रविवारी (दि. २८) तातडीने उपचारासाठी दिल्ली येथे हलविण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. याचदरम्यान, त्यांचं निधन झालं.

Balu Dhanorkar
Chandrapur Congress News : खासदारांची मृत्यूशी झुंज, अन् जिल्हाध्यक्षपदावर नियुक्तीची चर्चा !

धानोरकर यांचं सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार आहेत. तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी तेही रुग्णालयात होते. वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी ते भद्रावती येथे जाऊ शकले नव्हते.

लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. मात्र, 2019 ला मोदी लाटेतही लोकसभा निवडणुकीत धानोरकर हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभवाचा धक्का देत चंद्रपूर मतदारसंघातून खासदार झाले होते. शिवसेने(Shivsena)चे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राहिले होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता.

Balu Dhanorkar
Nana Patole Latest News : कसब्याप्रमाणेच पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही नाना पटोलेंनी हेरुन ठेवला उमेदवार; तयारीही सुरु झाली अन्...

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.

एकीकडे जिल्हाभरातील (Congress) काॅंग्रेसचे कार्यकर्ते खासदार धानोरकरांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करीत आहेत. दुसरीकडे रामू तिवारी यांची पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी आमदार धोटेंना नियुक्त करण्यात आले आहे. याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

काॅंग्रेस पक्षात अशा नियुक्त्या करताना चर्चा, विचारविमर्श केला जातो. त्यानंतरच नियुक्त्या केल्या जातात. बाळू धानोरकर यांची प्रकृती परवा-परवा बिघडली. त्यामुळे ते मृत्यूशी झुंज देत असताना जाणीवपूर्वक ही नियुक्ती करण्यात आली नसावी, असेही काहींचे मत आहे. पण धानोरकरांच्या प्रकृतीची जशी चर्चा सुरू आहे, तशीच या नियुक्तीचीही चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com