Maharashtra Congress : काँग्रेसमधील गृहकलह विकोपाला; नाना पटोलेंवर आता विदर्भातील काँग्रेस नेतेही नाराज

Political news : पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Nana Patole News : विधान परिषदेत मोठ्या प्रमाणात काँग्रेसअतंर्गत राजकारण झाल्याचा आरोप करीत आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आता विदर्भातील काँग्रेसचे नेतेही पटोले यांच्यावर नाराज असल्याचे उघड झाले आहे. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या नागपूर जागेसाठी घडलेल्या घडामोंडीसह इतर प्रकारांचाही उल्लेख केला आहे. याबाबत नाराज नेत्यांनी नाना पटोलेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केलीय.

यावेळी नेत्यांनी विदर्भात काँग्रेसला चांगली परिस्थिती असताना नाना पटोले (Nana Patole) पक्षांतर्गत वितुष्ट आणत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, नागपूर विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) नाना पटोले हे आधी गंगाधर नाकाडे, त्यानंतर राजेश झाडे यांना उमेदवारी देण्याचा तयारीत होते. मात्र स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांचा सुधाकर आडबाले (Sudhakar Adbale) यांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता.

नाना पटोले मात्र आडबाले यांना उमेदवारी देण्यासाठी तयार नव्हते. त्यातूनच पटोले यांनी सुधाकर आडबाले यांना काँग्रेसकडून (Congress) एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव विदर्भातील नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन आडबाले यांची उमेदवारीची घोषणा करावी लागली.

Nana Patole
Narayan Rane News : राज्यपाल कोश्यारी जाणार; नारायण राणे राज्यपाल होणार?

दरम्यान गेल्या नागपूर विधान परिषद निवडणुकीतही नाना पटोले यांनी आरएसएसच्या छोटू भोयर (Chhotu Bhoyar) यांना पक्षात आणून उमेदवारी दिली होती. मात्र ऐन निवडणुकीत छोटू भोयर पळून गेले होते. त्या प्रकरणी विदर्भातील नेत्यांनी याबाबत काही कारवाई झाली नसल्याची बाब पक्षश्रेष्ठी लक्षात आणून दिली आहे. अशा प्रकरणांमुळे नाना पटोले विदर्भात काँग्रेस पक्षाला अडचणीत आणत असल्याचा गंभीर आरोप विदर्भातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

Nana Patole
Nana Patole : पटोलेंच्या ‘त्या’ कॉलमुळे सुकर झाला धीरज लिंगाडेंचा विजय !

दरम्यान नाशिक विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात काँग्रेसचे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला. निवडणुकीत झालेल्या लढाईत ते मोठ्या फरकाने निवडून आले.

त्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. तांबे यांनी प्रदेश काँग्रेसकडून तांबे आणि थोरात कुटुंबियांना अडचणीत आणण्यासाठी विविध प्रकार केल्याचा आरोप केला. तसेच तांबे कुटुंबास काँगेसबाहेर ढकल्याचे सर्व डाव खेळले गेले. यासह एबी फॉर्मसारख्या बाबतीत प्रदेश काँग्रेस कसे गाफील राहते, असा प्रश्नही उपस्थित केला होता.

Nana Patole
Ashok Chavan News : चव्हाणांची `ती` मागणी रावसाहेब दानवेंनी केली पुर्ण ..

या आरोपास माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही पुष्टी दिली. तसेच पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नसल्याचं थोरात यांनी स्पष्टच सांगितलं आहे. त्यानंतर आता विदर्भातील काँग्रेस नेत्यांनीही पटोले यांच्याविरोधोत मोहीम उघडली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com