Congress Agitation : "गली गली में शोर है, चौकीदार चोर हैं"; काँग्रेसच्या आंदोलनातून मोदींवर निशाना

Adani group of Company - आदानी समुहात झालेल्या गुतंवणुकीच्या चौकशीची केली मागणी
Congress Agitation
Congress AgitationSarkrnama

Maharashtra Congress : आदानी समुहात केंद्र सरकारच्या दबावातून एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियातील पैसा आदानी समूहात गुंतवला गेला. दरम्यान हिंडेनबर्गच्या आहवालात आदानींनी कंपनीत मोठा आर्थिक गैरव्यावहार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहे.

त्याचा फटका एलआयसी आणि एसबीआय ला बसला आहे. परिणामी देशातील सर्वसामान्य जनतेचा केंद्र सरकारमुळं बुडाल्याचा आरोप विरोधकांनी केला. या पार्श्वभूमीवर आज राज्यभर एलआयसी आणि एसबीआयच्या शाखांसमोर काँग्रेसच्यावतीनं आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान लोकसभेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी आदानी समुहात झालेली 'एलआयसी' (LIC) आणि 'एसबीआय' बँकची (SBI Bank) आदानी समुहातील गुंतवणुकीबाबत न्यायमूर्तिंची समिती स्थापन करून चौकशीची मागणी करण्यात आली. विरोधाकांच्या या मागणीकडेही सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आदानी समुहातील गैरव्यावहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राज्य काँग्रेसच्या (Maharashtra Congress) वतीने आंदोलन करण्यात येत आहे.

Congress Agitation
Congress : आम्हाला तर होताच; पण ज्येष्ठ नेत्यांनाही पटोलेंचा त्रास, आशिष देशमुखांनी पुन्हा डागली तोफ…

एलआयसी आणि एसबीआयमध्ये सामान्य नागरिकांनी पैसे ठेवलेले असतात. ते पैसे मोदी सरकारने आदानी समुहात गुंतविण्याचा दाबवा या सार्वजनीक संस्थावर आणला. आता गैरव्यावराहामुळे आदानी समुहाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामुळे संबंधित संस्थांना फटका बसल्या असून यात जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुणे येथील आंदोलनातून केला आहे.

Congress Agitation
Kasba By-Election : बापट हात देणार का? पटोले म्हणतात मार्गदर्शन घेण्यासाठीच...

पुण्यातील (Pune) एलआयसी कार्यालयासमोर काँग्रसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सकरारविरोधात घोषणाबाजी करीत आदानी समुहातील गुंतवणीकीबाबत चौकशीची मागणी केली. तसेच पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. आता एलआयसी कार्यालय आदानी, नरेंद्र मोदीचे कार्यालय झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान येथे पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

Congress Agitation
Amit Deshmukh : काँग्रेसचे अमित देशमुख नाराज, काय आहे कारण?

मुंबईतील (Mumbai) आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केले. यावेळी काँग्रसच्या वतीने 'गली गली में शोर है, चौकीदार चौर है', अशी घोषणबाजी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाना साधण्यात आला.

यावेळी भाई जगताप म्हणाले, "आज रेल्वे स्थानकं, विमानतळ आदांनी कंपन्यांना देण्यात आली आहेत. भविष्यात रेशन दुकाने आदांनीकडे जाण्याची भिती आहे. आता झालेल्या घोटाळ्याची चेतन पारेख, हर्षद मेहतासारखी आदानी यांच्यावर कारवाई करावी. तसेच आदांनींवर कारवाई करण्यासाठी ईडीने पुढाकार घ्यावा", अशी मागणी केली आहे.

Congress Agitation
Ambadas Danve News : हे सरकारच अदानींच्या ताब्यात देवून टाका, अंबादास दानवे का संतापले ?

नागपूर (Nagpur) येथील एसबीआयच्या मुख्य कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आदांनी समुहात गुंतवणुकीसाठी केंद्राने एलआयसी आणि एसबीआयवर दबाव आणल्याचा आरोप केला. या आदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष विकास ठाकूर यांनी केलं. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. दरम्यानी प्रतिनिधी मंडळाने एसबीआय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

परभणी (Parbhani) येथेही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून या घोटाळ्यासह गुंतवणुकीबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com