'मोदीजी, फक्त माफी नको, नुकसान भरपाईही द्या'

फक्त माफी मागून चालणार नाही
'मोदीजी, फक्त माफी नको, नुकसान भरपाईही द्या'
Sanjay Raut

मुंबई : केंद्रीय कृषी कायद्यांच्या (Agricultural Act) विरोधातील आंदोलनादरम्यान सातशेहून अधिक शेतकऱ्यांनी (Farmers) बलिदान दिले. या लढ्यात बलिदान दिलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे फक्त माफी मागून चालणार नाही तर त्यांच्या या नुकसानीची भरपाई द्या, अशी मागणी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रसरकारकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) शेतकऱ्यांची माफी मागत कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर तब्बल एक वर्ष शेतकरी आंदोलन करत होते. कृषी कायदे मागे घेताना पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची माफीही मागितली. पण नुसती माफी मागून चालणार नाही. तुमच्या चुकीमुळे 700 शेतकरी कुटुंबांचे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून तातडीने आर्थिक मदत करा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut
पंकजा मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली मनातील खदखद्

केंद्रसरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन कायदे केले पण शेतकरीही सरकारपुढे झुकले नाही, शेवटी शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे सरकारलाच झुकाव लागलं. पण या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. 700 हून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेले. या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडली आहे. आता जर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी या कुटुंबांना मदत करावी, अशी मागणी होत असेल तर त्यात चूक काय आहे? असा सवालही यावेळी संजय राऊतांनी केला.

पीएम केअर फंडात हिशोबी रक्कम पडलेली आहे. त्यातून या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना थोडीशी मदत करावी. तुमच्या चुकीचे नुकसान ७०० शेतकरी कुटुंबाना भोगावे लागत आहे, त्यामुळे पीएस केअर फंडातून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत झालीच पाहिजे, असेही संजय राऊतांनी म्हंटल आहे.

देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागून चालणार नाही. त्यासाठी मदत करा. तुम्ही जी चुकी केली त्याचं नुकसान 700 कुटुंबांना भोगावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे, असं राऊत म्हणाले.

यावेळी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचीही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. काल रात्रीच त्यांच्याशी बोलणं झालं. लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल. त्यांनी पूर्णपणे बरे होऊन कामाला लागवं, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये. नंतरच कामाला सुरुवात करावी, असं त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.