मोदींना उपरती झाली ; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

कृषी कायदे (agricultural act) मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल, अशी माझी अपेक्षा आहे,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले.
मोदींना उपरती झाली ; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला
Narendra Modi, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : ''केंद्राने यापुढं कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे, म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. कृषी कायदे (agricultural act) मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल, अशी माझी अपेक्षा आहे,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे,'' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो. असो, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो.

Narendra Modi, Uddhav Thackeray
अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर अहंकार झुकला ; राहुल गांधीचं टि्वट पुन्हा व्हायरल

''महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे, शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे,'' असेही ठाकरे म्हणाले.

''देशातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झुकवलं,'' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

वर्षभर या देशातील शेतकरी लढत होते. लोकांनी प्राणाची आहुती दिली. मंत्र्यांनी गाड्या चढवून त्यांची हत्या केली आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही असे संबोधण्यात आले. शेतकरी मागे हटले नाही ते दटून राहिले शेवटी त्यांना कायदा मागे घ्यावा लागला. मागील ७ वर्षांमध्ये कोणताच निर्णय मोदी सरकारने मागे घेतला नाही. आम्ही ज्या पद्धतीने देश चालवायचा आहे त्याचप्रमाणे करु पण शेतकरी लढत राहिले. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा विजय शेतकऱ्यांचा असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

केंद्रसरकारने राजकीय भयातून तीन कृषी कायदे (agricultural act) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून दिल्ली, पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पण आज अखेर केंद्राला शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं. केंद्राला तीन कृषी कायदे मागे ध्यावे लागले. पंजाब, उत्तरप्रदेशातील आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केंद्रसरकारने हा निर्णय घेतला असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in