Ajit Pawar News : 1 एप्रिलला नागरिकांना मोठा 'शाॅक' बसणार; अर्थसंकल्पानंतर अजित पवारांचा खळबळजनक दावा

Maharashtra Budget Session 2023 : 'लबाडाच्या घरचं आवताण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही..'
Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama

Maharashtra Assembly Budget Session : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच उध्दव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे.मात्र,याचदरम्यान अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मोठं विधान केलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आपण पाहिला. खरंतर हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकराचा चुनावी जुमला आहे. यात आपल्याला दूरदृष्टीचा अभाव जाणवेल. तसेच वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे. या राज्यात अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ९ वेळा आणि मी स्वतः ७ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

Ajit Pawar News
Maharashtra Budget : शिक्षण सेवकांना बंपर लॉटरी; फडणवीसांच्या घोषणेने मिळणार बूस्टर

माझ्या मते स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे अशी टीका पवार यांनी यावेळी केली. तसेच मराठीत एक म्हण आहे की, 'लबाडाच्या घरचं आवताण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही'असं या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

याचवेळी पवार म्हणाले, मला अशी माहिती आहे की, 25 तारखेला अधिवेशन संपलं की, 1 एप्रिलला नागरिकांना मोठा झटका बसणार आहे. तेव्हा 1 एप्रिलला एप्रिल फुल नाही, तर झटकाच बसणार आहे. 30 ते 35 टक्के विजेची दरवाढ होणार आहे. फक्त ते मी आता सांगत नाही. अर्थसंकल्प झाल्यावर सांगेन, असं ते म्हणाले. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे असंही पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar News
Maharashtra Budget : ठाकरेंनी अर्थसंकल्पाचे एका शब्दांत केले वर्णन; म्हणाले...हा तर गाजर हलवा संकल्प!

राज्य कर्जाच्या खाईत असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प मांडला. अख्ख्या अर्थसंकल्पात शब्दांचे इमले बांधले आणि जनतेला स्वप्नात फिरवून आणलं. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा १४ मार्चचा निकाल विरोधात जातोय की काय, अशी शंका आल्यानेच निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला गेला आहे असंही पवार यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com