परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यासाठी CIDच्या हालचाली सुरु

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Mumbai police) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Paramvir Singh) यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल आहे.
 Param Bir Singh
Param Bir Singhsarkarnama

मुंबई : आठ महिन्यापासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) सुरु केली आहे. याबाबत राज्य सीआयडीने याबाबत गृहमंत्र्यालयाकडे रेड कॉर्नर काढण्यासाठी पत्र पाठविले असल्याचे सुत्रांनी सांगितले. परमबीर सिंह यांची मालमत्ताही जप्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Mumbai police) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Paramvir Singh) यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांना नुकतीच अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीआयडीकडून (CID)ही पहिलीच अटक आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटीच्या वसुलीचा आरोप परमबीर सिंह यांनी केल्यानंतर देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारने नेमलेला चांदिवाला आयोग करीत आहे. चांदिवाला आयोगाने परमबीर सिंह यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले पण परमबीर सिंह एकदाही चौकशीला आले नाहीत. . मे महिन्यापासून परमबीर सिंह कुठे आहेत हे पोलिसांनाही माहीत नाही.

 Param Bir Singh
ईडी माझ्या घरी आली तर मी त्यांचे स्वागत करेल : नवाब मलिक

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्यात सचिन वाझेला अनिल देशमुख यांनीच हॉटेल्स आणि बारमधून 100 कोटी रुपये घ्यायला सांगितल्याचा उल्लेख होता. तर गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे परमबीर सिंह यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी राज्य सीआयडी करीत आहे. सीआरपीसीच्या कलम 82 आणि 83 नुसार परमबीर सिंहांना फरार घोषित करण्यात येईल.

परमबीर सिंह देश सोडून जाऊ नयेत, यासाठी पोलिसांच्या वतीने रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात रेड कॉर्नल नोटिस जारी केली तर त्यांना देश सोडून जाणे कठीण होईल. याबाबतच्या सूचना देशातील सर्व विमानतळांना देण्यात येतील. अँटिलियाच्या परिसरात स्फोटके सापडल्याच्या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबीर सिंह यांच्या विरोधात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या आयुक्तपदावरुन हटवण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com