कंस अन् रावणाची प्रतिज्ञा टिकली नाही; तुम क्या चीज हो शरदबाबू?

Sharad Pawar | Aacharya Tushar Bhosale | : देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेता व्हायला भाग पाडलं त्याचवेळी शरद पवारांनी पायावर धोंडा पाडून घेतला
Sharad Pawar - Tushar Bhosale
Sharad Pawar - Tushar Bhosale Sarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) तरुण आमदारांनी काल मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये भाजपकडून (BJP) होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही”, असा विश्वास शरद पवार (Sharad Pawar) यांनी या आमदारांना दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले कंस अन् रावणाची आसुरी प्रतिज्ञा टिकली नाही, तुम क्या चीज हो शरदबाबू? असा टोला लगावला आहे. ट्विटरवरुन व्हिडिओ ट्विट करुन त्यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होऊ न देता विरोधी पक्षनेता व्हायला भाग पाडलं त्याचवेळी शरद पवार यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. हे त्यांनाही चांगलंच समजलं आहे.

Sharad Pawar - Tushar Bhosale
विधान परिषदेला एक पाऊल मागे आलेल्या महाडिकांनी विधानसभेला डाव साधलाच!

आज देवेंद्र फडणवीस हे सातत्याने ठाकरे सरकारचे पुराव्यानिशी वस्त्रहरण करत आहेत. त्यामुळे पुरत्या घाबरलेल्या शरद पवार यांनी स्वतःला आणि नवख्या आमदारांना धीर देताना असे वक्तव्य केले आहे की, 'घाबरू नका मी भाजपाला (BJP) पुन्हा सत्तेत येऊ देत नाही! पण परिस्थिती अशी आहे की जिथे कंसाची आणि रावणाची अशी आसुरी प्रतिज्ञा टिकली नाही तिथे तुम क्या चिज हो शरद बाबू ? बुरा ना मानो होली है!, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com