बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय घेता, पण तुमच्यापैकी एक तरी तिथे उपस्थित होता काय?

कोणी जबाबदारी घेणार नसेल तर मी घेतो असे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeary) होते.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

मुंबई : मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये आज शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडला. यात शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) यांनी विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीका केली. तसेच सरकार पाडण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांपर्यंवर त्यांनी हल्लाबोल केला. १९९२ च्या दंगलीत शिवसेना नसती तर आज टीका करणारे दिसले असते का? असा सवाल ठाकरेंनी विचारला. मात्र आता या सगळ्यावर शिमगा अजून लांब आहे असे असताना दसऱ्यालाच त्यांनी शिमगा केला असे म्हणत भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, वारंवार बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय घेता, पण तुमच्या पैकी एक तरी तिथे उपस्थित होता काय? कोणी जबाबदारी घेणार नसेल तर मी घेतो असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. बाळासाहेब ठाकरेंना तो अधिकार आहे, तुम्हाला नाही. तुम्हाला आत्ता हिंदुत्व आणि राम मंदिर आठवते हे काहीतरी वेगळेच समीकरण दिसतंय, असा ही घणाघात त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वावर बोलताना सहकारी पक्षाला विचारल का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

उद्धव ठाकरे यांनी आज बोलताना राज्यातील महिला अत्याचाराबाबत भाष्य केले. याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील महिला अत्याचार वाढत चालले आहेत त्यामध्ये नेमके काय करणार आहेत? कायदा पेंडिंग आहे. दिशा कायदा लवकर करुन टाका. तर मुंबईत सैन्याचे काम कसे चालते हे कळण्यासाठी संग्रहालय उभे करणार असल्याच्या घोषणेवर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे गेल्या दोन वर्षात काय झाले सांगा? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांनी ७५ हजार रुपये हेक्टर दिले

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश सुरु आहे. रस्ते दुरुस्त करणे, धरणे सुरक्षित करणे यासाठी तुम्ही पैसे दिले असतील तर त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे? शेतकऱ्याला तुम्ही दहा हजार रुपये हेक्टर दिले, पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात २० हजार ४०० रुपये हेक्टर आणि बागायतीला ५४ हजार रुपये हेक्टर दिले होते, ज्याला तुम्ही २५ हजार दिलेत त्यांना देवेंद्रजींनी ७५ हजार रुपये हेक्टर दिले होते, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

ड्रग्ज प्रकरणाचे गांभीर्य नाही

महाराष्ट्रात दोन वादळ आली, अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज प्रकरण समोर येत आहेत, त्याबाबतही चिमूटभर गांजा तुम्ही म्हणत आहात? याचा अर्थ याचे गांभीर्यच नाही. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांना कदाचित लवकर शिमगा आला असे वाटल्याने आज जेवढा म्हणून केंद्र आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा शिमगा त्यांनी केला, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मग अब्दुल सत्तार कुठून आले?

आजच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी बोलताना दोन्ही पोटनिवडणुकीत जगातल्या मोठा पक्षाकडे उपरे उमेदवार अशी टीका केली होती. यावर पंढरपूरचा उल्लेख करता मग अब्दुल सत्तार कुठून आले? भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा उमेदवार म्हणून पळविला. तो पराभूत झाला. तेथे आम्ही ज्याला निवडून आणले त्याला तुम्ही जागावाटपात जागा घेतल्यानंतर आमचा सिटिंग खासदार घेतला. अनेक ठिकाणी तुम्ही जागा शिवसेनेला घेतली पण उमेदवार भाजपचा घेतला, तुम्ही व्यापारामध्ये हुशार आहात, असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com