Chandrakant Patil : सीमावर्ती भागासाठी लवकरच मोठा निर्णय..! चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Chandrakant Patil : सध्याचं महाराष्ट्र सरकार बिचकणारं नाही. देवेंद्र फडणवीसांनी बोम्मई यांना बरोबर उत्तर दिलं आहे.
Bjp State President Chandrkant Patil
Bjp State President Chandrkant PatilSarkarnama

Chandrakant Patil Latest News : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील गावांवर दावा केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता निर्माण झालेल्या सीमावादावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

Bjp State President Chandrkant Patil
दादा भुसेंच्या चिरंजीवांची लोकसभेची तयारी; भाजपचे भामरे काय करणार?

भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील गावांबाबत केलेल्य वक्तव्याप्रमाणे काही होणार नाही. सध्याचं महाराष्ट्र सरकार बिचकणारं नाही. बसवराज बोम्मई यांना देवेंद्र फडणवीसांनी बरोबर उत्तर दिलं आहे. आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील सुमारे ८६५ गावांवर जो अन्याय होतो आहे, त्या सगळ्या गावांसाठी आगामी काळात एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या भागातील तरुण खूश होईल असा निर्णय घेतला लवकरच घेतला जाणार आहे असेही पाटील यावेळी स्पष्ट केले आहे.

Bjp State President Chandrkant Patil
राऊतांच्या जामीन प्रकरणी न्यायालयाने ईडी'ला पुन्हा फटकारले अन् दिले 'हे' निर्देश

... म्हणून नवले ऊड्डाणपूल तोडता येणार नाही!

एनएचएआय आणि एका संस्थने याआधी नवले पुलावर होणार्या अपघातांवर अनेक उपाययोजना केल्या होत्या. आणि त्याचाच परिणाम म्हणून तेथील अपघात कमी झाले होते. मात्र, या पूलाबाबत सखोल अभ्यास केला गेला असून रविवारचा अपघात हा जवळपास ९ महिन्यानंतर झाला आहे. नवले पुलावरील उजव्या बाजूचा ट्रॅक हा अवजड वाहनांसाठी ७ किलोमीटरपर्यंत आरक्षित राहावा. डावी बाजू नाही आरक्षित करता येणार नाही कारण पुढे सर्व्हिस रोड जोडले जातात. मात्र, नवलेसारखा एवढा मोठा ब्रीज तोडून पुन्हा बांधता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका पाटील यांनी मांडली आहे.

Bjp State President Chandrkant Patil
Amruta Fadnavis : राज्यपाल महाराष्ट्रप्रेमीच; पण त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला जातो..!

जायका प्रकल्पाचं रखडलेलं काम लवकरच सुरु होणार

पुणे जिल्ह्याच्या सर्व भागात पिण्याला, शेतीला पाणी कमी पडणार नाही. जिल्हयातील १०० टक्के धरणं भरली आहेत. आपण जे पाणी वापरतो ते ट्रीट केले पाहिजे. म्हणजे त्याचा उपयोग अनेक ठिकाणी होईल. तसेच जायका प्रकल्पाचं काम देखील येत्या काही दिवसांत काम सुरू होईल अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in