BRS News : 'बीआरएस' पक्षानं महाराष्ट्रात पहिल्या विजयाचा गुलाल उधळला, 'या' पोटनिवडणुकीत उमेदवार विजयी

K Chandrashekhar Rao : 'बीआरएस'ने महाराष्ट्राच्या राजकारणातही काही दिवसांपूर्वी एन्ट्री घेतली होती...
BRS News
BRS News Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मागील काही दिवसांपासून भारत राष्ट्र समिती(बीआरएस) या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. याच धर्तीवर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातही काही दिवसांपूर्वी एन्ट्री घेतली होती. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सभा देखील घेत आगामी सर्वच निवडणुका लढवणार असल्याचे संकेत राव यांनी जाहीर केलं होतं. आता बीआरएसला अखेर राज्यात पहिलं यश मिळाले आहे.

बीआरएस पक्षाची २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील जाहीर सभा झाली होती. या सभेनंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचं उमेदवार विजयी झाला आहे.

गफार सरदार पठाण असं बीआरएसच्या (BRS)विजयी उमेदवाराचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे राज्यातील बीआरएस पक्षाचा हा पहिला विजय असल्याचं बोललं जात आहे.

BRS News
Manish Sisodia News : ''जेल भेजो या फाँसी दे दो...''; सिसोदियांचा तुरुंगातून मोदी सरकारवर हल्लाबोल

भारत राष्ट्र समिती(BRS) ने तेलंगणाबाहेर जाऊन देशातील इतर राज्यांत आपल्या पक्षाचा विस्तार करताना आपला पहिला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. यावेळी विधानसभा, महानगरपालिकेसह आगामी सर्व जिल्हा परिषद निवडणुका लढण्याचा निर्णय तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर केला आहे.

याच पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव(Chandrashekhar Rao) यांच्याकडून राज्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी त्यांनी मराठवाड्यातील नांदेडला दोन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अशा तीन जाहीर सभा देखील घेतल्या आहेत. तर राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. तर अनेक माजी आमदार, खासदार यांच्यासह इतर पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे देखील बीआरएसमध्ये प्रवेश होत आहे. तर आगामी काळात देखील असेच प्रवेश दिले जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बीआरएसकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे.

BRS News
Devendra Fadanvis : सावनेरमध्ये कुठलाही नवीन प्रयोग आम्हाला करायचा नाही !

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठं पाऊल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. नांदेड शहरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ते 20 मे असे दोन दिवसीय हे शिबीर असणार असून, यासाठी स्वतः के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे उपस्थित राहणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com