नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी अमोल इघेंची हत्या; राजकीय वादाची किनार?

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरु
नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी अमोल इघेंची हत्या; राजकीय वादाची किनार?
Amol igheSarkarnama

नाशिक : नाशिक भाजपचे (Nashik Bjp) पदाधिकारी अमोल इघे (Amol Ighe murder) यांची निर्घृण हत्या झाली आहे. प्राथमिक दृष्ट्या राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारस हि घटना घडली. या घटनेनंतर नाशिक शहराच एकच खळबळ उडाली असून सध्या शासकीय रुग्णालय आणि सातपूर परिसरात तणावाचे वातावरण आहे. अवघ्या ४ दिवसात नाशिकमधील ही हत्येची (Nashik crime) तिसरी घटना आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातपूरचे भाजप (Bjp) मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन करुन घराबाहेर बोलावून घेतले. इघे घराबाहेर कार्बन नाका परिसरात आले असता वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. युनियनच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Amol ighe
चंद्रकांत पाटलांपाठोपाठ फडणवीस दिल्लीत; मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत?

दरम्यान, इघेंच्या हत्येनंतर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण आहे. इघे यांच्या नातेवाईक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिकची कुमक बोलावून घेतली आहे. अवघ्या चार दिवसात हत्येची तिसरी घटना घडली घडल्यामुळे नाशिकमधील नेमकं चाललयं काय असा सवाल विचारला जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in