भाजपच्या महिला आमदारांकडून मोदींसाठी खास पैठणी शेला...

भाजपच्या दहा महिला आमदारांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली.
BJP women MLA meet Modi
BJP women MLA meet ModiSarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील दहा महिला आमदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. या आमदारांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi) थेट तक्रार पंतप्रधानांकडे केली. राज्य सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलने करतो. मात्र तरी सरकारवर परिणाम होत नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. त्यावर मोदी यांनी आंदोलने कराच पण लोकांमध्ये जाऊन त्यांचे सेवा करण्यावर भर द्या, असा सल्ला या आमदारांना दिला. (BJP women MLAs from Maharashtra meet Modi in Parliament)

संसदेत राज्यातील आमदारांसाठी प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. त्यानिमित्त 100 हून अधिक आमदार दिल्लीत आहेत. त्यातील भाजपच्या दहा महिला आमदारांनी आज सकाळी 11 वाजता संसदेत मोदींची भेट घेतली. आमदार माधुर मिसाळ, देवयानी फरांदे, मनीष चौधरी, भारती लव्हेकर, मेघना बोर्डीकर, मंदा म्हात्रे, नमिता मुंदडा, श्वेता महाले, मोनिका राजळे यांचा यात समावेश होता. प्रत्येकीच्या मतदारसंघाची आणि कामाची माहिती घेत मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला.

BJP women MLA meet Modi
BJP women MLA meet Modisarkarnama

माधुरी मिसाळ यांची मुलगी श्रीलंकेत आहे. त्यामुळे या पंतप्रधानांसोबत श्रीलंकेचाही विषय निघाला. मोदी सरकारमुळे तेथील लोकांना मोठे सहकार्य झाल्याची भावना तेथील जनतेत असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितले. शेजारधर्म आपण निभवायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यावर मोदी यांनी दिली. विविध महिला आमदारांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या मतदारसंघात येलदरी धरणाचा प्रश्न तसेच पाण्याचा प्रश्न मांडला.

BJP women MLA meet Modi
समृद्धी महामार्गावरून माझं नाव कुणीही मिटवू शकत नाही !

राष्ट्रमाता जिजामातांचे जन्मस्थळ असेलल्या सिंदखेडराजाचा विषय या वेळी निघाला. तर मला या ठिकाणी कोणी बोलविलेच नाही. पण मी तेथे नक्की येईन, असे आश्वासन मोदी यांनी दिले. श्वेता महाले यांनी मोदींसाठी खास तयार करून घेतलेला पैठणी शेला यावेळी भेट दिला. गुढीची प्रतिकृतीही त्यांना देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com