BJP Political News : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी भाजप वापरणार ८०च्या दशकातील 'हा' फॉर्म्युला

Maharashtra BJP : भाजप हा पक्ष त्याच्या सुरुवातीच्या वाटचालीत विशिष्ट जातीपुरता मर्यादित होता.
BJP News
BJP NewsSarkarnama

Mumbai : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेसाठी 'मिशन ४८' तर विधानसभेसाठी '२०० प्लस' मोहीम भाजपा राबवणार आहे. मात्र, या निवडणुका भाजपसाठी निश्चितच सोप्या नसणार आहे. कारण निवडणुकीत शिंदे गट-भाजप युतीसमोर महाविकास आघाडीचं मोठं आव्हान असणार आहे. त्याचमुळे भाजपकडून विजयासाठी नवनवीन फॉर्म्युल्यांवर काम सुरु आहे. यातच विधानसभेच्या २०२४ मध्ये होत असलेल्या निवडणुकांतील विजयासाठी भाजपनं आपला ८० च्या दशकातील जुनाच फॉर्म्युला वापरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपनं १९८० च्या दशकापासूनच 'माधव' फॉर्म्युला स्वीकारला होता. याच धर्तीवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांनी माळी, धनगर आणि वंजारी समाजाला एकत्र करण्यासाठी सातत्यपूर्वक आणि उल्लेखनीय प्रयत्न केले होते. आणि याचा फायदा भाजपला निश्चितपणे झाला. ठराविक लोकांपुरताच मर्यादित असलेला भाजप तळागळातल्या अठरा पगड जाती जमातींमध्ये रुजविण्यात मोठा वाटा आहे.

BJP News
DRDO News : 'हनीट्रॅप'मध्ये अडकलेल्या डॉ.कुरुलकरांच्या जागी 'डीआरडीओ'च्या संचालकपदी मकरंद जोशी

भाजप हा पक्ष त्याच्या सुरुवातीच्या वाटचालीत विशिष्ट जातीपुरता मर्यादित होता. त्यामुळे पक्षातील प्रमुख नेतेमंडळींनी भाजपला तळागळात पोहचविण्याचा व सर्वसमावेशक चेहरा असलेला पक्ष म्हणून रुजविण्यात जोरदार प्रयत्न केले. याचाच भाग म्हणून वसंतराव भागवत यांनीच 'माधव' फॉर्म्युला आणला. त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर आणि महादेव शिवणकर यांच्यासह इतर नेत्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपला दैदिप्यमान विजय मिळाला होता. महाराष्ट्रा(Maharashtra)तही भाजपनं चांगलं यश मिळवत थेट १२२ जागा मिळवल्या होत्या. यात मुंडेंनी वापरलेल्या 'माधव' ने निर्णायक भूमिका बजावली होती. पुढे भाजपकडून २०१९ ला या फॉर्म्युल्यांकडे काहीसं दुर्लक्ष झाल्याची चर्चा होती.

BJP News
Sharad Pawar On Varsha : शरद पवार अनेक वर्षांनी 'वर्षा'वर ; आठवणींना उजाळा !

आता मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 80च्या दशकातील आपल्या जुन्याच फॉर्म्युल्याकडे जाण्याची शक्यता आहे. ‘माधव’नावाचा फॅक्टर भाजप राज्यात राबवणार असल्याची शक्यता आहे. ‘माधव’ म्हणजे, माळी, धनगर आणि वंजारी हे होय. या समाजाच्या मतांवर भाजपकडून माधन फॅक्टरच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत केलं आहे.

अहमदनगर(Ahmednagar)चं नाव बदलून आहिल्यानगर करणं हा त्या भाजपच्या त्याच रणनीतीचा भआग असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये माळी, वंजारी आणि धनगर या ओबीसी समुदायातील जातींची मतं निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्याच धर्तीवर या जातींना आपल्याकडं आकर्षित करत राज्यात सत्ता मिळवायची अशी भाजपची खेळी आहे.

BJP News
Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची न्यायालयात धाव; शुक्रवारी सुनावणीची शक्यता, काय आहे कारण ?

पडळकरांना ताकद....

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय समाज पक्षामधून सुरु झाला. त्यानंतर पक्षांतर करत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. काही कारणास्तव त्यांनी भाजपमधूनही माघार घेतली. नंतर ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाले. नंतर पुन्हा पक्षांतर करुन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १४ मे २०२० रोजी ते विधानपरिषदेवर निवडून आले.

नगर जिल्ह्यात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. संगमनेर, पारनेर, राहुरी, नगर तालुका, कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघात समाजाची मते निकालावर परिणाम करणारी ठरतात. राज्यातही नगरसह पुणे, सोलापूर, बीड जिल्ह्यात समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्याच धर्तीवर पडळकरांना भाजपकडून मोठी ताकद युवा नेतृत्व म्हणून पुढं आणलं जात आहे.

BJP News
Eknath Shinde on Ashadhi Wari : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आषाढी वारीत सहभागी वाहनांना टोलमाफी, सुसज्ज यंत्रणा आणि बरचं काही..

ओबीसी, मराठी नेत्यांसाठी मानाचं पान...

भाजप(BJP)कडून ग्रामपंचायत ते लोकसभा अशा कुठल्याही निवडणुकांसाठी अगदी नेटानं तयारी करण्यात येते. त्यात वरिष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी ते कार्यकर्ते असे सर्वजण १०० टक्के झोडून देत काम करतात. आता पुढील निवडणुकीची मोर्चेबांधणी म्हणून केंद्रासह व राज्यात सोशल इंजिनिअरिंगला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भागवत कराड यांना केंद्रात तर राज्यात ओबीसी नेते अतुल सावे यांना मंत्रिपद दिलं. तसेच ओबीसी नेते असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड हा त्याच खेळीचा एक भाग असल्याची चर्चा आहे.

धनगर समाज आहिल्यादेवींना देवासारखं पुजतो. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अकोला, परभणी, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात धनगर समाजाचं मोठं प्राबल्य आहे. राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघात या समाजाचं अस्तित्व आहे. त्यामुळे या समाजाने ठरवलं तर 100 मतदारसंघाचा निकाल बदलू शकतो. तर 40 विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक आहेत. त्यामुळेच आगामी काळात भाजपचा माधव फॉर्म्युला वापरण्याकडं कल आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com