Jalna Protest News : 'भाजपने माफी मागावी,' सुळेंची मागणी तर 'रक्त तुमच्याच हाताला,' वाघ यांचा पलटवार..

Chitra Wagh Vs Supriya Sule : हे जाणून बुजून घडवलं जात असेल तर...
Jalna Protest News
Jalna Protest NewsSarkarnama

Mumbai News : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर आणि विशेषत:गृहमंत्रीपदाची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा सरकारने मराठा समाजाची क्रूर फसवणूक केली आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. यावर आता भाजपकडून चित्रा वाघ यांनी सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

Jalna Protest News
Jalna Maratha Protest : लाठीचार्ज करणाऱ्या घमेंडिया मस्तवाल सरकारची मस्ती उतरविण्याची आली वेळ,अंतरवली घटनेवर रोहित पवार संतापले

चित्रा वाघ म्हणाल्या, "मराठा समाजासाठी ‘मगरमच्छ के आंसू’ ढाळण्यापेक्षा तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर आज संपूर्ण मराठा समाज तुमचा आभारी राहीला असता. मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायचं एवढेच तुमच्या सिलॅबस मध्ये आहे का ? तुमचा सत्तेत राहण्याचा स्ट्राईक रेट अतिशय उत्तम असल्याचा अभिमान आहे, मग मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्याचा स्ट्राईक रेट कमी असल्याचा कधी खेद का वाटला नाही ? मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिम्मत का दाखविली नाही आपण? असा सवाल वाघ यांनी केला. "

"ताई, ट्रिपल टेस्ट पूर्ण करणं, सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं आणि कोर्टात लढाई लढणं, या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. पण तुमचा प्रॅाब्लेम वेगळा आहे. फडणवीस यांना टार्गेट करणं हे तुमचं लक्ष्य आहे. राष्ट्रवादी पक्षातील काही मंत्र्यांनी तुमची साथ सोडली, म्हणून तुमची जळजळ होणं स्वाभाविक आहे. पण त्याचा राग काढण्यासाठी मराठा आंदोलकांच्या खांद्याचा वापर करू नये, ही विनंती आहे, असेही वाघ म्हणाल्या

Jalna Protest News
Marathwada Water Supply : पश्चिम महाराष्ट्र विरूद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार; अजित दादांचे आश्वासन, पण शिंदे गटाचा विरोध

"तुमच्या कार्यकाळात तुम्ही मावळ मध्ये प्रकल्पग्रस्तांवर गोळीबार केला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांचे रक्त तुमच्या हाताला लागले आहे. समाजकल्याणाच्या कामात तुमची रक्तपिपासूवृत्ती उफाळून येते, हा इतिहास आहे. आता मराठा आरक्षणाचा खोटा कळवळा दाखवताय? तेव्हा बंदुकीचा चाप ओढताना मात्र तुम्हाला कर्तव्यधर्माचा सोयीस्कर विसर पडला होता. तेव्हा तुमच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही.आत्ता ही महाराष्ट्र इतके दिवस शांत होता मग आत्ताच कसा काय पेटतोय? याची सुद्धा चौकशी व्हायला पाहीजे. जर हे जाणून बुजून घडवलं जात असेल तर त्याचाही छडा लागायला पाहीजे. ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका ही नम्र विनंती, असे वाघ म्हणाल्या आहेत?

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे ?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली, परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Jalna Protest News
Abhijeet Patil Meet BJP Leader : सुप्रिया सुळेंनी राखी बांधलेल्या अभिजीत पाटलांनी घेतली भाजप नेत्याची भेट

मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु, भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही ही, खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in