ठाकरे सरकार म्हणजे निजामशाही कारभार ; पडळकरांचा हल्लाबोल

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) ''वर्षा''च्या बाहेर पडायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच महाभकास आघाडीनं घेतला आहे,''
Uddhav Thackeray, gopichand padalkar
Uddhav Thackeray, gopichand padalkarsarkarnama

मुंबई : ''शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर महाविकास आघाडी सरकारनं कुठलीही मदत केली नाही,'' असा आरोप करीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (bjp mla gopichand padalkar) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) ''वर्षा''च्या बाहेर पडायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच महाभकास आघाडीनं घेतला आहे,'' असा आरोप पडळकरांनी केला आहे. ''या सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये,'' असे पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर म्हणाले, ''पहिल्या पावसामुळे झालेल्या विलंबामुळे पेरणीला झालेला उशीर, खरीपाचं पीक तोंडावर असताना आलेलं वादळ, ओला दुष्काळ, सोयाबीनच्या गंजीच्या गंजी वाहून गेल्या, ज्यांचं पीक कापणीला आलं होतं, ते ही पाण्यात सडलं असून पीक विम्याचे पैसे रखडलेले आहेत. या सर्व आस्मानी संकटावर सरकारने कुठलीही मदत तर केलीच नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामेही करायला सरकारी यंत्रणा तयार नव्हत्या. मुख्यमंत्रीही 'वर्षा'च्या बाहेर पडायला तयार नव्हते. शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. हातचा राखीव ठेवलेला पैसाही शेतकऱ्यांनी रब्बीसाठी लावला होता. त्यालाही मातीमोल करण्याचं या प्रस्थापितांच्या सरकारनं जणू काही मनावरच घेतलेलं दिसतयं,''

Uddhav Thackeray, gopichand padalkar
चंद्रकांतदादांची प्रकृती नीट राहण्यासाठी मी उत्तर देणार नाही..त्यांची विधानं नैराश्यातून!

''अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीनं वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमकं त्याच वेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार या सरकारने चालवला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं ठेकाच जणू या महाभकास आघाडीनं घेतला आहे.''

''दोन-दोन चार-चार वर्षामागील वीजबील, पंप नसणाऱ्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबील देणे, यात अनेक त्रुटी व अनियमीतता आहेत. तीन एचपी धारकांना पाच एचपी चे बील, पाच एचपी धारकांना साडेसात एचपीचे बील, साडेसात एचपी धारकांना दहा एचपीचे बील दिले आहे. असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यांनीशी वीजबीला संदर्भातील गैरकारभार उघड झाला आहे,'' असा आरोप पडळकारंनी केला आहे.

''ऐन कापणी हंगामात वीज कनेक्शन तोडणीमुळं झालेल्या नुकसानाचे पंचनामे आपण स्वत: करावे, आपआपल्या कार्यक्षेत्रातील तहसीलदाराकडे ते सूपूर्द करून पोचपावती घ्यावी. जेणेकरून संपूर्ण नूकसानाची भरपाई मिळवण्यासाठी आपल्याला मोठा लढा उभारता येईल,'' असे आवाहन पडळकरांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com