भाजपचे मिशन २०२४! स्वबळावर सत्तास्थापन करण्यासाठी आखला 'मास्टर प्लॅन'

BJP | Devendra Fadnavis | 2024 Elections | Maharashtra : भाजपच्या सर्व महत्वाच्या नेत्यांची मुंबईत खलबत...
Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Girish Mahajan, BJP mission 2024 News, BJP Mission 2024 for Maharashtra
Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Girish Mahajan, BJP mission 2024 News, BJP Mission 2024 for Maharashtra Sarkarnama

मुंबई : भाजपने आता २०२४ च्या तयारीला अधिकृतपणे सुरुवात केली आहे. काल मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, आमदार संजय कुटे, आमदार रविंद्र चव्हाण, पंकजा मुंडे, विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते. (BJP Mission 2024 News)

या बैठकीत भाजपने २०२४ च्या निवडणुकांसाठीची रणनीती आखलेली पहायला मिळाली. या रणनितीनुसार भाजपच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांकडे राज्यातील २ लोकसभा मतदारसंघाची आणि त्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. यात मतदारसंघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी, बूथ लेव्हलपासूनच्या कार्यकर्त्यांकडे जबाबदारी, मतदारसंघातील प्रश्न अशा तयारीला सुरूवात केली आहे.

Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Girish Mahajan, BJP mission 2024 News, BJP Mission 2024 for Maharashtra
मोदी सरकारनं पेट्रोल मागच्या वर्षी स्वस्त केलं पण आता दहाच दिवसांत त्यापेक्षा जास्त महागलं

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय घेतल्याप्रमाणे खालील नेते करणार संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटना बांधणी करणार आहेत. या दौऱ्याचं समन्वय भाजपचे संघटनमंत्री श्रीकांत भारतीय (Srikant Bharti) करणार आहेत.

१. देवेंद्र फडणवीस - सोलापूर, अहमदनगर, २. चंद्रकांत दादा पाटील - ठाणे ग्रामीण आणि नाशिक

३. सुधीर मुंनगंटीवार - बीड, जालना, ४. पंकजा मुंडे - कोल्हापूर, सांगली

५. आशिष शेलार - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ६. श्रीकांत भारतीय - नांदेड, परभणी

७. चंद्रशेखर बावनकुळे - अकोला, अमरावती, ८. प्रविण दरेकर - पालघर मिरा भाईंदर

९. गिरीष महाजन - उस्मानाबाद, हिंगोली, १०. संजय कुटे - दक्षिण रायगड,उत्तर रायगड

११. रविंद्र चव्हाण - सातारा, पुणे ग्रामीण, १२. रावसाहेब दानवे - बुलढाणा नंदूरबार

१३. संभाजी पाटील निलंगेकर - गोंदिया, भंडारा, १४. सुधीर मुंनगंटीवार - जालना आणि बीड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com