''माझ्या जीवात जीव असेपर्यंत पंकजा मुंडेंना सोडणार नाही : महादेव जानकर

माजी मंत्री महादेव जानकर (mahadev jankar) यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) यांच्या कामाचे कैातुक केलं. ''माझ्या जीवात जीव असेपर्यंत पंकजा मुंडेंना सोडणार नाही,'' असे जानकर म्हणाले.

''माझ्या जीवात जीव असेपर्यंत पंकजा मुंडेंना सोडणार नाही : महादेव जानकर

बीड : ''आमदार, खासदार मिळतात, पण नेता मिळत नाही. सत्ता येईल, जाईल, पक्ष येतील किंवा जातील पण नेता राहिला पाहिजे. सत्तेमागे आम्ही जाणार नाही सत्ता आमच्या डोक्यावर येईल. नेत्याला सांभाळण्याचा काम तुमचे आमचं आहे,'' असे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, माजी मंत्री महादेव जानकर (mahadev jankar) यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) यांच्या कामाचे कैातुक केलं. ''माझ्या जीवात जीव असेपर्यंत पंकजा मुंडेंना सोडणार नाही,'' असे जानकर म्हणाले.

सावरगाव (बीड) येथील दसरा मेळ्याव्यात जानकर बोलत होते. खासदार सुजय विखे, आमदार सुरेश धस यावेळी उपस्थित होते. ''आजचा कार्यक्रम राजकीय नाही. मला घाबराचं कारण नाही, मी तिकीट मागायला जाणार नाही. गोपीनाथ मुंडे माझ्या कानात कुरर्र केले होतं तुमची मान खाली जाणार नाही, असे काम आम्ही करणार नाही. नेता बनवता येत नाही. तर तो रक्तामधून तयार होत असतो. आरशासमोर नक्कल करुन नेता होता येत नाही. ''पंकजा ताई इंतजार का फल मिठा होता है 'जनतेला आपला नेता कोण आहे, हे ओळखता आले पाहिजे. गोपीनाथ मुंडे नसते तर हा जानकर मेंढरं हाकत बसला असता,'' असे जानकर म्हणाले.

''ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र म्हणतं आमच्याकडे डाटा नाही, राज्य सरकारही काही करत नाही. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जातनिहाय गणना करण्याची विनंती केंद्र सरकारला केली पाहिजे. जे जातननिहाय गणना करणार नाही, त्याला हिसका दाखविल्याशिवाय जनता राहणार नाही,'' असा इशारा जानकर यांनी यावेळी मोदी सरकारला दिला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आजच्या दसरा मेळाव्यात ( dasara melava) काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. गेल्या वर्षी हा मेळावा ऑनलाइन झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. मात्र, यंदा हा मेळावा जाहीररित्या होत असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागल होत.

''मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे, '' असल्याचे पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) यांनी काल एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत. तुमचंही ऐकायचं आहे, मलाही बोलायचं आहे. या दोन वर्षात अनेक घटना घडल्या. या दोन वर्षात मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, अनेक संघर्ष, अनेक यश-अपयश याची सर्व कहाणी. तिथून आपण कोणती उमेद घ्यायची आणि भविष्याचा प्रवास कसा करायचा हा भाषणाचा सूर असेल. मी काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष आहे, माझंही लक्ष आहे, कारण मी जे काही बोलते ते स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने बोलते. भगवान बाबांच्या आशिर्वादाने आणि मुंडे साहेबांच्या संस्कारावर आधारीत बोलते'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com