अजितदादांना आता कुटुंबिय आठवतेय का?

अजित पवारांना (ajit pawar) माझा प्रश्न आहे की जरंडेश्वरचा मालक कोण आहे, असा प्रश्न किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

अजितदादांना आता कुटुंबिय आठवतेय का?
ajit pawar, kirit somaiyasarkarnama

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांच्या कारखान्यांवर आणि संचालकांच्या घरांवर आयकर विभागाने आज छापे टाकले. यानंतर अजित पवार यांनी सांगितले,''सत्तेचा गैरवापर आम्ही कधी केला नाही, पण माझ्या नातेवाईकांवरच का कारवाई केली, याचे वाईट वाटतं,'' यावर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे

किरीट सोमय्या म्हणाले, ''आता अजित पवारांना साखर कडू वाटायला चांगली आहे का, हजारों शेतकऱ्यांचे कारखाने ज्यावेळी पवार कुंटुबिय लुटत होते, तेव्हा त्यांना त्यांची आठवण होत नव्हती का? मी काल शेतकऱ्यांना जाऊन भेटलो. त्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रार केली की आमच्या जमिनी, आमचे कारखाने पवार कुंटुबिय आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लुटले आहेत. ईडी, आयटी कुठे धाडी टाकत आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण अजित पवारांना (ajit pawar) माझा प्रश्न आहे की जरंडेश्वरचा मालक कोण आहे, त्याचे ते अनेक महिने उत्तर देत नाही. हा कारखाना कोणी विकत घेतला, किती रुपयांना घेतला. त्यांनी बेकायदा कारभार केला असेल तर त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. महाराष्ट्राला लुटायचा ठेका तुमच्या परिवाराला दिला आहे का. या सरकारने दीड वर्षात जनतेला लुटुन खाल्ले आहे. मी रोज ओरडतो जरंडेश्वरचा मूळ मालक कोण पण अजितदादा सांगत नाही.''

''हा कारखाना गुरू कमोडिटी ओमकार बिल्डरने जरंडेश्वर साखर कारखान्याला लिजवर दिला होता. अजित पवार त्यांना दरवर्षी किती भाडं देतात हे देखील स्पष्ट करावे. अजित पवार आणि ओमकार बिल्डरचे संबंध काय? यावर शरद पवार आणि अजित पवार का बोलत नाहीत? त्यांची वकिली का करतात. ओमकार बिल्डरला कारखाना विकत घेण्यासाठी पैसे कोणी दिले? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

ajit pawar, kirit somaiya
'जिम कॉर्बेट' नामांतराचा निर्णय मूर्खपणाचा ; आव्हाड भाजपवर संतापले

सोमय्या म्हणाले, ''चोरी की है तो कबूल करना पडेगा, असं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला. तुम्ही पाप केलंय, तुम्ही घोटाळे केलेत तर तुम्ही कबूल करा, असं सोमय्या म्हणाले. ''जरंडेश्वर साखर कारखान्याचा सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मालकीची लेयर ही पुढे पुढे जात आहे. खरं मालक चालक लाभार्थी हे अजित पवारांना माहिती आहे. ते का घोषित करत नाही. प्रश्न एका साखर कारखान्याचा नाही. ही मोडस ऑपरेंडी आहे,''

Related Stories

No stories found.