सुप्रियाताई, मन मोठं करा, अजितदादा तुमचं तरी ऐकतात का?

''जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवारांना द्या. ते तुमच तरी ऐकतात का पाहू,''
keshav upadhye,supriya sule
keshav upadhye,supriya sulesarkarnama

पुणे : ''पेट्रोल-डिझेल आणि स्वंयपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न करावे,'' अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी गुरुवारी लोकसभेत केली. यावरुन भाजपने सुळेंवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी टि्वट करीत सुळेंना टोला लगावला.

''महागाईची झळ सर्वसामान्यांना बसली आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेल, स्वंयपाकाचा गॅस यावरील कर कमी करावेत,'' अशी मागणी सुळे यांनी लोकसभेत केली आहे. त्यावर केशव उपाध्य आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, ताई, मन मोठं करा! केंद्राने अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवारांना द्या. ते तुमच तरी ऐकतात का पाहू.

केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली आहे. आरोग्य खात्याच्या पेपर फुटीवरुन उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. ''आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात आरोग्य खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होऊ लागल्याने, या परीक्षेतील गोंधळाची थेट जबाबदारी आता आरोग्यमंत्र्यांवर आली आहे. ही परीक्षा देणाऱ्या सुमारे दहा लाख उमेदवारांचं नुकसान केवळ माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून निघणारे नाही. विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच प्रायश्चित्त घ्यावे", अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे.

keshav upadhye,supriya sule
बारा आमदारांच्या निलंबनावरील सुनावणी पुढे ढकलली

केशव उपाध्ये म्हणाले, ''मुळात या खात्यातील सहा हजारांहून अधिक जागांची भरती रखडवून ठाकरे सरकारने उमेदवारांना नैराश्यात ढकलले होते. वारंवार मागणी करूनही परीक्षांबाबत चालढकल करण्यात येत होती. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या एजन्सीला परीक्षांचे कंत्राट देण्यासाठी त्यांच्या सोयीकरिता तब्बल 21 वेळा निविदेत बदल करण्यात आला, तेव्हाच ठाकरे सरकारचा हेतू स्पष्ट झाला होता. परीक्षांच्या काही तास अगोदर काही उमेदवारांना व्हॉटसअप, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका मिळाल्या. अखेरच्या क्षणी वेळापत्रक बदलून परिश्रमपूर्वक तयारी करणाऱ्या उमेदवारांची फसवणूक करण्यात आली, तरीही आरोग्यमंत्री राजेश टोपे एजन्सीची पाठराखण करून परीक्षा वेळेवर व पारदर्शक होण्याच्या बढाया मारत होते,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com