भोळ्या बाळासाहेबांना हिंदुत्वाच्या नावाखाली वेळोवेळी फसवलंय; पण मी फसणार नाही!

Shivsena | BJP : शिवसेना पूर्वी अशी नव्हती. बाळासाहेबांच्या काळात आमचे संबंध चांगले होते. उद्धव ठाकरे आल्यापासून बिघडले
भोळ्या बाळासाहेबांना हिंदुत्वाच्या नावाखाली वेळोवेळी फसवलंय; पण मी फसणार नाही!
Devendra Fadnavis & Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेना पूर्वी अशी नव्हती. बाळासाहेबांच्या काळात आमचे संबंध चांगले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आल्यापासून बिघडले, असा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत असतो. या आरोपावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही भोळ्या बाळासाहेबांना फसवलं, ते तुमच्याकडे कानाडोळा करत होते, पण मी फसणार नाही असे म्हणतं भाजपवर जोरदार निशाणा साधला. लोकसत्ता वृत्तपत्राच्या 'दृष्टी आणि कोन’ या वेब-उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संवादाने झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, खासदार चिंतामणराव वनगा यांचे निधन झाल्यानंतर पालघरची पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी श्रीनिवास वनगा आणि त्यांचे कुटुंब माझ्याकडे आले, आम्ही त्यांचे स्वागत केले. तो म्हणाला, मी निवडणूक लढवतो. मी म्हटलं लढं. आता राहिले होते ८ ते ९ महिने आणि तेवढ्या काळासाठी निवडणूक कशाला लढवायची, हे मला पण कळत होते. मात्र आता चिंतामणराव वनगा भाजपशी (BJP) किती एकनिष्ठ होते हे सांगण्याची गरज नाही, आणि त्यांच्या मागे तुम्ही उभं राहत नाही, ही मला चिड आणणारी गोष्ट होती.

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
"फुकटात करमणूक" : उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसेच्या सभेची दोन शब्दांत खिल्ली

त्यावेळी देखील आपल्यावर बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नसल्याचा आरोप केला असे ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, बरोबर आहे. बाळासाहेब भोळे होते आणि बाळासाहेबांना तुम्ही कसं वेळोवेळी फसवले ते मी डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे थोडेसे धुर्तपणे तुमच्याशी वागत आहे. मी भोळा नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही काय डाव साधत होता, याकडे बाळासाहेबांनी कानाडोळा केला, पण मी तसं करणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं आहे.

राज ठाकरे यांच्यावरही निशाणा :

उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही खोचक टोला लगावला. ते म्हणाले, "जन्मापासून ते वेगवेगळे झेंडे घेता आहेत. वारंवार झेंडे बदलावे का लागतात? आम्ही कधी बदलला का? अस्तित्व दाखवण्यासाठी हे करावं लागतं आहे. दोन वर्षांचा मोठा कालखंड गेला आहे. पण या काळात कोरोनामुळे नाटक, सिनेमा सगळं काही बंद होतं. त्यामुळं आता जर फुकटात करमणूक होत असेल तर का नको?

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
भाजप आणि राष्ट्रवादीचं ठरलं होतं पण शिवसेनेला काहीच माहिती नव्हतं!

हिंदुत्वाच्या या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात हे आत्तापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ करणारे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत. शिवसेना हा पूर्वी पासून हिंदुत्ववादी पक्ष आहे, हे मी विधानसभेतही बोललो आहे, ते लपवण्याची गरज नाही. आता काहीजण हे करून बघू, ते करून बघू असं म्हणत आहेत. हे गाजराच्या पुंगीसारखं आहे. वाजली तर वाजली. नाही तर मोडून खाल्ली, असं भोंगेधारी, पुंगाधारी फार पाहिलेत" अशीही टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.