भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवणार; कोल्हापुरच्या धनंजय महाडिकांचे नाव जाहीर
Dhananjay MahadikSarkarnama

भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवणार; कोल्हापुरच्या धनंजय महाडिकांचे नाव जाहीर

Rajysabha | Dhananjay Mahadik : राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली.

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. आज रात्री उशिरा महाडिक यांचे नाव दिल्लीतून जाहीर झाले. यापूर्वी संध्याकाळी ७ च्या सुमारास भाजपने दोन उमेदवारांची घोषणा केली होती. यात केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या उमेदवाारीची घोषणा केली होती.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक जाहीर झाली आहे. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्येक एक उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसकडून उत्तरप्रदेशमधील कवी आणि काँग्रेसचा अल्पसंख्यांक चेहरा समजले जाणारे इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. शिवाय शिवसेनेने विद्यमान खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ३१ मे आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे राऊत आणि पवार यांनी उमेदवार अर्ज भरले आहेत. तर काँग्रेसचे इमरान प्रतापगड हे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर उद्या सोमवारी (ता. ३० मे) अर्ज भरणार आहेत. भाजपचे उमेदवारही उद्याच अर्ज भरण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीची मुदत ३ जून असून १० जून रोजी मतदान होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

राज्यसभेसाठी जाहीर झालेले पक्षनिहाय उमेदवार :

  • भाजप-पियूष गोयल, डॉ अनिल बोंडे, धनंजय महाडिक

  • शिवसेना- संजय राऊत, संजय पवार.

  • राष्ट्रवादी काँग्रेस- प्रफुल्ल पटेल.

  • काँग्रेस-इम्रान प्रतापगडी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in