Rahul Gandhi News: राहुल गांधींचा थेट सुप्रिया सुळेंना फोन; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर काय म्हणाले?

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अध्यक्षपद सोडू नये यासाठी राज्यभरात पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरू आहेत.
Rahul Gandhi News, Supriya sule
Rahul Gandhi News, Supriya sule Sarkarnama

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली. पवारांनी दिलेल्या अचानक राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी पक्षासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच एकीकडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती करण्यात येत असतानाच दुसरीकडे नवीन अध्यक्षपदी कोण होणार याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या घडामोडींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट सुप्रिया सुळेंना फोन केला असल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवार(Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर राज्यासह देशाच्या राजकारणातही एकच खळबळ उडाली. पवार यांचा अचानक राजीनामा हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याचमुळे पायउतार होण्याच्या घोषणेमुळे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भावूक झाले. तसेच पवारांनीच अध्यक्षपदावर काय राहावं असा आग्रही धरला जात आहे. राष्ट्रवादीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये यासाठी राज्यभरात पदाधिकाऱ्याचे राजीनामे सत्र सुरू आहेत.

Rahul Gandhi News, Supriya sule
Maharashtra politics : मुख्यमंत्री होणे हेच अजितदादांचे अंतिम ध्येय ; सुळेंना नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी..

याचवेळी पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याचवेळी राहुल गांधी यांनी खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांना फोन करत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा केली आहे.

राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी सुळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधताना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका मांडली. गांधी यांनी यावेळी पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंतीही गांधी यांनी केली. यावेळी शरद पवार यांच्या असा अचानक राजीनाम्यामागचं कारण देखील जाणून घेतलं. गांधी यांच्यासोबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही सुळे यांना फोन केला असल्याचं बोललं जात आहे.

Rahul Gandhi News, Supriya sule
Karnataka Election : राऊतांनी मराठी भाषिकांचा मुद्दा तापवला, फडणवीसांच्या सभेत एकीकरण समिती दाखवणार 'काळे झेंडे'

...आणि पुन्हा अजितदादांचं पोस्टर झळकलं!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अध्यक्षपद सोडू नये यासाठी राज्यभरात पदाधिकाऱ्याचे राजीनामे सत्र सुरू आहेत. अशा तापलेल्या वातावरणात धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात पक्षाच्या एका माजी नगरसेवकाने `भावी मुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख असलेले बॅनर लावले. या बॅनरची चर्चा सोशल मीडियावर सुरू होताच, नेत्यांकडून फोनाफोनी झाली आणि हे पोस्टर अचानक गायब झाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com