Shirdi Breaking News : साईभक्तांसाठी मोठी बातमी! १ मेपासून बेमुदत शिर्डी बंदची हाक; काय आहे कारण?

Shirdi Protest : ...यामुळे साई भक्तांची गैरसोय होय होण्याची शक्यता.
Shirdi News
Shirdi NewsSarkarnama

Shirdi : राज्यासह देशभरातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंवर आहे. सुट्टीत तर या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्यानं शिर्डीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. याचदरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. १ मेपासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे साईभक्तांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

शिर्डीत आता साई मंदिरात सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय ओद्योगिक सुरक्षा बल(CISF) नियुक्ती करण्यात आली आहे. याच नियुक्तीला स्थानिकांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिर्डी ग्रामस्थांसह सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून १ मे पासून बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संग्राम कोते यांनी देखील सीआयएसएफच्या नियुक्तीसह अतर मागण्यांसाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

Shirdi News
Sanjay Raut News : भीमा पाटसचं राजकारण तापलं; राऊतांकडून शितोळ्यांच्या पुतळ्याला पुष्पहार,कामगारांकडून दुग्धाभिषेक

काय आहे प्रकरण?

1 मे पासून बेमुदत शिर्डी(Shirdi) बंदची हाक देण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थ यादरम्यान बंद पाळणार आहेत. साई मंदिरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या नियुक्तीला शिर्डी ग्रामस्थांचा विरोध आहे. मंदिरात सीआयएसएफ सुरक्षा नियुक्त करु नये अशी मागणी शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांची आहे.

या सुरक्षेमुळे भाविकांसह ग्रामस्थांना त्रास होणार असल्याचं शिर्डीकरांचं म्हणणं आहे. बंददरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरु राहाणार आहे. CISF सुरक्षेला विरोधासह इतर काही मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत. साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे.

Shirdi News
Karnatak Election 2023 : धर्माच्या आधारित आरक्षण देणं संविधानाच्या विरोधात : योगी आदित्यनाथ

काय आहे मागण्या?

साईबाबा संस्थानला सीआयएसएफ अर्थात केंद्रीय सुरक्षा बल यंत्रणा नको. संस्थानचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस ऐवजी प्रांताधिकारी दर्जाचा अधिकारी असावा , साई संस्थान विश्वस्त मंडळात स्थानिकांना ५० टक्के आरक्षण असावं या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र दिनापासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.

बंद दरम्यान 'हे' सुरु राहणार...

शिर्डीत सर्व ग्रामस्थांनी १ मे पासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. यामुळे भाविकांची गैरसोय होय होण्याची शक्यता आहे. मात्र आता, साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सीआय़एसएफ सुरक्षेच्या विरोधासह इतर काही मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत. साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com