Pradeep Kurulkar Case: मोठी बातमी! ' डॉ. कुरुलकरांनंतर अन्य एक अधिकारी 'हनीट्रॅप' मध्ये; 'ATS'च्या हाती महत्वाचे धागेदोरे...

Maharashtra ATS : प्रदीप कुरूलकर ज्या महिलेच्या संपर्कात होते. त्याच महिलेच्या संपर्कात...
Pradeep Kurulkar case
Pradeep Kurulkar case sarkarnama

Pune News: 'डीआरडीओ'चे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून 5 मे ला अटक केली. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला व्हाट्सअॅ्पवरून कॉल आणि मॅसेजवरून गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप आहे. त्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक 'डीआरडीओ'चे अधिकारी डॉ. प्रदीप कुरूलकर(Pradeep Kurulkar) यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कुरुलकर यांच्यासह अन्य एक अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचं महाराष्ट्र एटीएसने केलेल्या तपासात समोर आलं आहे.

Pradeep Kurulkar case
DRDO News : 'रॉ'च्या तपासात धक्कादायक बाबी? ; कुरूलकरांनी पाकीस्तानला माहिती पुरवली!

प्रदीप कुरूलकर ज्या महिलेच्या संपर्कात होते. त्याच महिलेच्या संपर्कात अन्य एक अधिकारीही असल्याचे आले तपासात समोर आलं आहे. एटीएसने त्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे साक्षीदार म्हणून एटीएस (ATS) पाहत आहे.कुरुलकरच्या रिमांड सुनावणीदरम्यान एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचा आयफोन जप्त केल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे.

Pradeep Kurulkar case
Pradeep Kurulkar: कुरुलकरांचा पाय आणखी खोलात; तपासातून खळबळजनक माहिती समोर

एटीएसने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते डीआरडीओ(DRDO)चे शास्त्रज्ञ कुरुलकर यांच्या कॉल आणि डेटा तपशीलांची छाननी करत होते. तेव्हा त्यांना या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्याचा नंबर सापडला. त्यानंतर एटीएसने त्या दुसऱ्या अधिकाऱ्याचा मोबाईल फोन आणि इतर संबंधित उपकरणे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहेत. अधिकाऱ्याने महिलेसोबत कोणतीही गोपनीय किंवा गोपनीय माहिती शेअर केली आहे की नाही यावर पुढील कारवाई अवलंबून असेल असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

(Edited By Deepak Kurulkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com