PSI भरती गैरव्यवहार : भाजपा नेत्याविरोधात अटक वॉरंट, एकासाठी साठ लाखाची होती बोली...

पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची बाब ‘सीआयडी’ तपासात समोर आली आहे.
karnatak High Court
karnatak High Court Sarkarnama

बंगळूरू : गुलबर्गा येथील तिसऱ्या कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी उपनिरीक्षक पोलिस (PSI) भरती परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी भाजपा (BJP) नेत्या दिव्या हागरगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. फरार आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असता त्यांची याचिका फेटाळली. दरम्यान, प्रत्येक उमेदवाराकडून लाच म्हणून ६० लाख रुपये घेण्याचा करार झाला होता आणि पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची बाब ‘सीआयडी’ तपासात समोर आली आहे.

karnatak High Court
दिल्लीप्रमाणे राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न : पवारांचा गंभीर आरोप

गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) याप्रकरणी ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा दिव्या हागरगी, शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ, अर्चना आणि शांतीबाई या शिक्षिका आणि कनिष्ठ अभियंता मंजुनाथ मेळकुंडी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे आवाहन न्यायालयाला केले. याचिका स्वीकारून, न्यायाधीश संतोष श्रीवास्तव यांनी अटक वॉरंट जारी केले आणि आरोपींना एका आठवड्यात तपास यंत्रणेसमोर शरण येण्यास सांगितले.

karnatak High Court
भास्कर जाधवांनी अजितदादांसमोर शब्द दिला आणि शिवसैनिक बिथरले...

दरम्यान, ‘सीआयडी’च्या पथकाने मंगळवारी या प्रकरणाच्या संदर्भात गुलबर्गा येथील रहिवासी एन. व्ही. सुनीलकुमारला अटक केली. तो ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ब्लूटूथ डिव्हाइस वापरून परीक्षा लिहून ‘पीएसआय’ भरती परीक्षेत यशस्वी उमेदवार ठरला. ‘सीआयडी’ने यापूर्वीच अटक केलेल्या रुद्रगौडा पाटील यांची मदत तपासासाठी घेतली होती. सीआयडीने सुनीलकुमार यांना कागदपत्रांची पडताळणी आणि चौकशीसाठी बंगळूरू येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. गैरप्रकारात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला नंतर सीआयडी कोठडीत घेतले. आरोपींनी परीक्षेत उमेदवारांना मदत करण्यासाठी प्रत्येकी ६० लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे समजते.

अमृत पॉल यांची बदली

राज्य सरकारने पीएसआय बेकायदेशीर भरती प्रकरणी राज्य सरकारच्या भरती विभागातील एएमडीपी अमृत पॉल यांची बदली केली आहे. १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमृत पॉल यांची भरती विभागातून अंतर्गत सुरक्षा दलाच्या एडीजीपीपदी बदली केली आहे. अमृत ​​पॉल हे पीएसआय भरती गैरप्रकारात सहभागी असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसने रान उठविल्यानंतर पॉल यांची बदली झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com