अखेर संजय पांडे पायउतार; राज्याच्या पोलिस दलाला मिळाले नवे बॉस!

Maharashtra | Director general of state | Rajneesh-seth | Sanjay Pandey : संजय पांडे यांच्याकडे प्रभारी म्हणून पोलिस महासंचालक पदाची सुत्रे देण्यात आली होती.
Sanjay Pandey - Ranjeesh seth
Sanjay Pandey - Ranjeesh seth Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी (Director general of state) रजनीश सेठ (Rajnish Seth) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. याशिवाय गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते.

रजनीश सेठ यांच्याव्यतिरीक्त मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemnat Nagrale) आणि होम गार्डचे महासंचालक के. व्यंकटेशम यांचेही नाव चर्चेत होते. याआधी तत्कालिन पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर एप्रिल २०२१ पासून त्यांच्या जागी संजय पांडे यांच्याकडे प्रभारी म्हणून पोलिस महासंचालक पदाची सुत्रे देण्यात आली होती.

Sanjay Pandey - Ranjeesh seth
मतदान संपताच ममतांनी माजी मुख्यमंत्र्यांना दाखवला घरचा रस्ता...

मात्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात ॲड. दत्ता माने यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं होतं. याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगानेही संजय पांडे (Sanjay Pandey) या पदासाठी पात्र नसल्याची शिफारस केली होती.

Sanjay Pandey - Ranjeesh seth
"माझ्या हत्येचा कट रचला जातोय"; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

संजय पांडे यांनी सरकारी सेवेतून मध्यंतरात अवकाश घेवून खासगी क्षेत्रात सेवा केली होती. त्यामुळे सुमारे दोन वर्षे सेवेत नसलेल्या अधिकाऱ्याला राज्याच्या पोलिस महासंचालक करण्यास विरोध केला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाने ही भीती अखेर खरी ठरवली होती. यासोबतच महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.वेंकटेशम आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस देखील आयोगाने केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com