कर्मचाऱ्यांना अखेरचा इशारा; उद्या सकाळपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...

मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते.
कर्मचाऱ्यांना अखेरचा इशारा; उद्या सकाळपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...
Anil Parab Sarkarnama

मुंबई : आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी तुर्तास माघार घेतली आहे. सदाभाऊ खोत यांनी ही घोषणा केली आहे. तसेच यापुढे आंदोलन सुरु ठेवायचे की नाही, याचा निर्णय कामगारांनी घ्यायाचा आहे, असेही खोत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आता खोत आणि पडळकरांची जोडी जरी आंदोलनातून बाहेर पडली असली तरी कर्मचारी मात्र आंदोलन आणि विलीनीकरणावर ठाम आहेत.

कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया देताना तुटेपर्यंत ताणू नये, अन्यथा नंतर जोडता येणार नाही असा इशारा दिला आहे. परब म्हणाले, सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लेखाजोखा मांडला आहे. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. कामगारांना कामावर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहून त्यानंतर पुढे कसे जायचे याचा महामंडळ निर्णय घेईल, असाही इशारा मंत्री परब यांनी दिला आहे.

Anil Parab
ST Strike : आझाद मैदानातील आंदोलनातून सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांची माघार!

खोत आणि पडळकर यांच्याविषयी बोलताना अनिल परब म्हणाले, माझा संबंध कामगारांशी आहे, त्यांची लिडरशीप कोणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे. पण जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे संप मागे घेवून कामावर रूजू व्हावे. जर काही राहिले असेल तर समितीसमोर मांडा. संप करून वेठीला धरू नका, असेही आवाहन परब यांनी केले.

Anil Parab
आंदोलनात जेवढं मिळतं तेवढं घ्यायचं आणि... ; पडळकरांचा सूर बदलला

मुंबईतून अपक्ष उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील

राज्यात विधानपरिषदेच्या सहा जगांसाठी निवडणुक होत आहे. ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी सध्या महाविकास आघाडीकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. मात्र ते काँग्रेसचे नेते असल्याने त्यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. अनिल परब यांनीही मुंबईतून अपक्ष उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे. जर कोपरकर यांनी मुंबईतून अर्ज मागे घेतला तर भाजपचे राजहंस सिंग आणि सेनेच्या सुनील शिंदे यांची बिनविरोध निवड होऊ शकते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in