Anjali damania Tweet Viral: ''...आणि लवकरच अजित पवार भाजपसोबत जाणार!''; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar News : ''…आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची!''
Devendra Fadnavis - Ajit Pawar
Devendra Fadnavis - Ajit PawarSarkarnama

Mumbai News : मागील वर्षी जून महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी एक टि्वट केलं आहे. त्यात त्यांनी एकप्रकारे भाजपचा पुढचा प्लॅनच सांगितला आहे. मात्र, या टि्वटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दमानिया म्हणाल्या, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली.

Devendra Fadnavis - Ajit Pawar
Ajit Pawar News : अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका; पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याची तक्रार; काय आहे प्रकरण?

किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची...

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत, तेही लवकरच. बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मागील आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) सात आमदारांसह नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं होतं.

Devendra Fadnavis - Ajit Pawar
Amit Shah News : अमित शाह यांनी चंद्रकांतदादांचे कान टोचले ; 'त्या' विधानावर नाराजी, शेलारांना फोन..

“किळसवाणं राजकारण...''

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया(Anjali Damania) यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट केला आहे आणि “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं कॅप्शन अंजली दमानिया यांनी दिलं आहे. त्यामुळे अजितदादा नॉट रिचेबल अशा बातम्यांना आणि चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

अजित पवार भाजपसाठी पूरक...

अंजली दमानिया म्हणाल्या, आतापर्यंत आठ ते 10 पत्रकारांशी बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार हे भाजप(BJP)ला सॉफ्ट आहेत. ते विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक नाही. ते भाजपला पुरक भूमिका घेतात. असंही सांगितलं जातंय की, 23 जणांच्या सह्या झाल्या आहेत. याला काय म्हणायचं? या सर्व संकेतामुळे मी ट्विट केलं असंही दमानिया यांनी सांगितलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com