Amravati : गाडीच्या काचा लावलेल्या होत्या, म्हणून बांगर बचावले...

तेव्हा डोळ्यात अश्रू आणत बांगर यांनी शिवसेना व पक्षप्रमुख ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले होते. (Mla Santosh Bangar)
Attack On Mla Santosh Bangars Car News, Amravati
Attack On Mla Santosh Bangars Car News, AmravatiSarkarnama

अमरावती : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेशी गद्दारी करून शिंदेसोबत गेलेल्या आमदार, मंत्र्याविरोधातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. (Amravati) हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेच्या निमित्ताने राज्यात फिरणाऱ्या मंत्र्यांना याचा फटका बसू लागला आहे. काल परभणीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवत शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओक्केच्या घोषणा देत जाब विचारला होता. (Shivsena) त्यानंतर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीच्या नेहरू चौकात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला चढवला.

बांगर यांच्या गाड्यांचा ताफा जाणार हे समजाताच पाच-सात शिवसैनिक चौकात जमले आणि बांगरची गाडी येताच ते तुटून पडले. (Santosh Bangar) बांगर बसलेल्या ठिकाणी काचेवर चापटा मारत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. गाडीच्या काचा लावलेल्या होत्या म्हणून बांगर बचावले अन्यथा शिवसैनिकांनी त्यांना घेरलेच होते.

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला विरोध दर्शवत शिंदे गटाने कोर्टाची पायरी चढली. गटप्रमुखांच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत दसरा मेळाव शिवतीर्थावरच होणार असे ठामपणे सांगितले. योगायोग म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देखील दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर देखील शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला. यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप पसरला.

अशातच शिंदे सेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला उत्तर म्हणून राज्यात हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा सुरू केली. शिंदेसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत हे मराठवाडा, विदर्भात मेळावे घेत आहेत. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खालच्या पातळीवर टीका होत असल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर होत असल्याचे बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्यातून दिसून आले.

आमदार बांगर हे आज अमरावती जिल्ह्यात होते. अंजनगाव सुर्जी येथील नेहरू चौकातून त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असतांना दबा धरून बसलेल्या पाच ते सात शिवसैनिकांनी बांगरांच्या गाडीवर हल्ला चढवला. गाडीच्या समोरच्या सीटवर बांगर बसलेले होते, त्याच काचेवर एका शिवसैनिकाने चापटा व बुक्या मारल्या. अचनाक झालेल्या हल्यामुळे मागच्या गाडीत सुरक्षेसाठी असलेले पोलिस गाडीतून खाली उतरले, त्यांनी शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला, तोच समोरच्या बाजूने पळत जाऊन पुन्हा शिवसैनिकांनी बांगर यांच्या गाडीवर चापटा मारल्या.

Attack On Mla Santosh Bangars Car News, Amravati
गुरू-शिष्य भेट : चौथीत शिकवणारे शिक्षक दानवेंना पाहून म्हणाले, माझे शिकवणे सार्थकी लागले..

तोपर्यंत मागच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला चढवला. अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडला. त्यामुळे बांगर यांचा ताफा वेगाने पुढे निघून गेला आणि पुढचा अनर्थ टळला. संतोष बांगर यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये अधिक चीड असल्याचे पहायला मिळाले. कारण शिंदे सेनेत बांगर हे शेवटच्या क्षणी दाखल झाले होते.

विशेष म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून बांगर यांचा हिंगोली जिल्ह्यात शिवसैनिकांनी सत्कार केला होता. तेव्हा डोळ्यात अश्रू आणत बांगर यांनी शिवसेना व पक्षप्रमुख ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले होते. एवढेच नाही, तर विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी उद्धव गटासोबत राहून मतदानही केले. पण दुसऱ्या दिवशी बांगर एकनाथ शिंदे यांना जावून मिळाले आणि विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी शिवसेनेच्या विरोधात मतदान केले. हा विश्वासघात शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला. त्याचेच पडसाद अमरावतीत उमटल्याचे पहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in