Amol Kolhe On belgaon : बेळगावचा 'बेळगावी' उल्लेखानंतर अमोल कोल्हेंचा माफिनामा !

Amol Kolhe On belgaon : कोल्हेंचा सीमावर्ती भाग दौरा...
Amol Kolhe On belgaon :
Amol Kolhe On belgaon :Sarkarnama

Amol Kolhe On belgaon : बेळगावचा बेळगावी असा उल्लेख केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माफी मागितली आहे. आपल्याकडून अनावधानाने बेळगावचा उल्लेख बेळगावी असा झाला, असं स्पष्टीकरण कोल्हे यांनी दिले आहे. सीमाभागातील मराठी बांधवांनी कायम आपल्याला प्रेम दिलं आहे, असे ही ते म्हणाले.

Amol Kolhe On belgaon :
Chinchwad By-Election : ठाकरे-पवारांच्या आग्रहानंतरही कलाटेंनी माघार का घेतली नाही? ‘हे’ होते त्याचे खरे कारण..

अमोल कोल्हे म्हणाले, "येत्या पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे, असं मला सांगण्यात आलं आहे, म्हणून या कार्यक्रमाला मी येत होतो, परंतु या कार्यक्रमाच्या संदर्भात आता निपाणीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याला जात असताना घाईमध्ये, अनावधानाने या प्रोगॅमसंदर्भात भाष्य करत असताना, बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला, याबद्दल मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील, त्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माझी काय भूमिका आहे, ते आजतागायत सर्वांना माहिती आहे. मी आजही त्या भूमिकेवर ठाम आहे."

Amol Kolhe On belgaon :
Satara News : "पाटण, कोरेगावातील गद्दारांना गाडा.."

"आपल्या सीमाभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहतोय, म्हणून केवळ या कार्यक्रमाला येण्याचं मी कबूल केलं होतं. यामध्ये बेळगावचा माझ्याकडून जो माझ्याकडून अनावधानाने, घाईमध्ये चुकीचा उल्लेख झाला. त्याबद्दल मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या भावना दुखावल्यात्याबद्दल सर्वांची माफी मागतो," असे कोल्हे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com