बिग-बींच्या बॉडीगार्डला दिड कोटी पगाराचा आरोप निराधार, चौकशी अहवाल सादर

चौकशीचा अहवाल मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सुपूर्त करण्यात आला आहे.
Amitabh Bachchans police bodyguard transferred over income issue
Amitabh Bachchans police bodyguard transferred over income issueSarkarnama

मुंबई : एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओला मिळणाऱ्या पगाराएवढा पगार महानायक अमिताभ बच्चन बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे यांना देत होते, असा आरोप काही दिवसांपुर्वी करण्यात आला होता. मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे आता प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. शिंदे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल नुकताच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सुपूर्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस शिपाई असलेले जितेंद्र शिंदे हे २०१५ पासून अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. या कालावधीत शिंदेंना बच्चन यांच्याकडून सुमारे दीड कोटी रुपये पगार मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण चांगलेच उचलून धरले. शिंदे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांची डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यात तातडीने बदली करण्यात आली.

ही बदली नियमीत असल्याचे सांगितले गेले मात्र शिंदेवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत पोलीस आयुक्तांकडून संरक्षण व सुरक्षा शाखेला चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शिंदे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांचा प्राथमिक चौकशीचा अहवाल नुकताच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सुपूर्त करण्यात आला आहे. या अहवलात शिंदे यांच्या विरोधातील दीड कोटी रुपयांचा आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

चौकशीत याप्रकरणाशी संबंधीत सर्व व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले होते. तसेच शिंदे यांच्या बँक खात्याचीही तपासणी करण्यात आली होती. त्यात शिंदे यांच्याकडून कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी मुंबईत खरेदी केलेले घर हे जुनी मालमत्ता विकून व गृहकर्ज घेऊन खरेदी केल्याचेही तपासणीत निष्पन्न झाले आहे.

तसेच अमिताभ बच्चन यांना पोलिसांव्यतिरिक्त ज्या खासगी कंपनीकडून सुरक्षा पुरवली जाते ती शिंदेंच्या पत्नी व मित्राच्या नावे असल्याचा आरोप झाला होता. मात्र संबंधित कंपनीचे कंत्राट व व्यवहार ही खासगी बाब असल्याने पोलीस म्हणून शिंदे यांच्याकडून कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या अहवालानंतर त्यावर निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार पोलीस आयुक्तांना आहे. पण प्राथमिक चौकशीत आरोपांमध्ये कोणतीही तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com