Uddhav Thackeray, Ajit Pawar
Uddhav Thackeray, Ajit Pawarsarkarnama

'२ सदस्यीय' प्रभागाच्या चर्चांना अजितदादांकडून ब्रेक; शिवसेनेच्या मनातीलच होणार

Ajit Pawar | Municipal Corporation | Election : काँग्रेस आणि राष्ट्रवादी २ सदस्यीय प्रभागासाठी आग्रही होती.

पुणे : राज्यात ओबीसी आरक्षणा रद्द झाल्यामुळे निवडणूक लागू नये यासाठी राज्य सरकारने कायद्यान्वये प्रभाग रचनेचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत. त्यामुळे सध्याची प्रभाग रचना रद्द झाली आहे. यानंतर आता निवडणूक कमीत कमी ६ महिन्यांसाठी पुढे गेले असल्याचे सांगितले जात आहेत. मात्र अशातच निवडणुका सहा महिने पुढे गेल्या, असे काही सांगता येत नाही. पुढील काही दिवसात, महिन्यात अचानक निवडणुका जाहिर होतील, असे म्हणतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इच्छूकांची झोप उडवून दिली आहे.

पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले, मागासवर्गीय समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी आमचा खटाटोप सुरु आहे. यासाठी एक कायदा आम्ही एकमताने तयार केला आहे. परंतु शेवटी उच्च आणि सर्वोच्च न्यायालय आहे, कोणीही न्यायालयात दाद मागू शकते. न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. पण सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की, कृपा करून तुम्ही गाफील राहू नका. येत्या काही दिवसात, महिन्यात अचानक निवडणुका जाहिर होतील. प्रभाग रचनेच्या हरकती- सूचना निवडणूक आयोगाकडे गेलेले आहेत. कदाचित तिकडे तुम्ही फिरायला जाताल आणि इकडे निवडणूक जाहिर व्हायची.

याशिवाय अजित पवार यांनी यावेळी प्रभाग रचनेच्या चर्चांना देखील पूर्णविराम दिला. मागच्या काही दिवसांपासून राज्यात प्रभाग रचना पुन्हा दोन सदस्यीय होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, प्रभाग २ सदस्यीय होणार या चर्चांना काहीच अर्थ नाही. प्रभाग रचना तीन सदस्यीयच राहणार आहे. आता लढणाऱ्या उमेदवारांना थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. कारण निवडणुकीला किती दिवस बाकी आहेत. ते आताच सांगता येणार नाही. त्यामुळे हात आखडता घेतला, असे काही नंतर सांगू नका. हे मी आज सांगतो. पुन्हा मला दोष देऊ नका. नाहीतर आम्हाला फसवलं राव, असं म्हणालं. पुन्हा मला दोष देवू नका, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले.

भाजपने २०१७ मध्ये चार नगरसेवकांचा प्रभाग केला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यात दुरूस्ती करण्यात आली होती. नव्या कायद्यानुसार पुन्हा प्रभागरचना करण्याची वेळ येणार आहे. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोनचा प्रभाग असावा, यासाठी आग्रही होती. मात्र शिवसेनेचा तीनच्या प्रभागाचा हट्ट असल्याने आणि मुख्यमंत्री त्यावर ठाम राहिल्याने तसाच निर्णय झाला. आता मात्र पुन्हा `दोनचा प्रभाग`, यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोर दिला जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. मात्र या चर्चांना आता अजित दादांनी पूर्णविराम दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com