Maharashtra Politics : अजितदादाचं ठरलं; ''आधी जून महिन्यात गेलेलं आघाडीचं सरकार परत आणणार,नंतर मुख्यमंत्री...''

Ajit Pawar News : आमच्याकडे मुख्यमंत्री पदाचे अनेक प्रबळ दावेदार...
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Maharashtra Political News : कुणाला असं ठरवून मुख्यमंत्री पद मिळत नसतं. जो १४५ ते १४६ आमदारांची जुळवाजुळव करायला यशस्वी होतो तो मुख्यमंत्री होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत कुणाला माहीत होते, ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. खरंतर संपू्र्ण महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं वाटलं होतं. पण हे कदाचित शिंदेंना माहीत असेल पण त्यांनी कधीही चेहऱ्यावर दाखवलं नाही असं रोखठोक मत व्यक्त करतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'साम' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी ४० आमदार असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात तर मग अजित पवार का मुख्यमंत्री होऊ शकत नाही या प्रश्नावर पवार म्हणाले, आत्ता महाविकास आघाडी टिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचसोबत आम्ही विकासाकामांना प्राधान्य देऊ,कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करु, जातीय सलोखा ठेवत चांगलं काम करु असं जनतेला विश्वास द्यावा लागेल असंही पवार म्हणाले.

Ajit Pawar
Udhhav Thackeray : उद्धवजी, तुम्ही शंभर वेळा आलात तरी, खेडचा आमदार योगेश कदमच : सभेपूर्वीच कदमांनी डिवचलं!

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहिला तर अजित पवार हेच एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील यावर रोखठोक मत व्यक्त करताना पवार म्हणाले, आमच्याकडे मुख्यमंत्री पदाचे अनेक प्रबळ दावेदार आहे. मी नावं घेणार नाही, पण त्यांनाही वाटत असेलच की, मुख्यमंत्री व्हावे. पण याबाबत विधायक ठरवतील. पण सर्वात आधी माझ्यासमोर जून महिन्यात जे महाविकास आघाडी सरकार गेलं आहे. ते पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करणार नंतर मुख्यमंत्रीपदाबाबतचं बघू असंही पवार यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar
Chavan on sanjay Jadhav : अशोक चव्हाणांनी टोचले खासदार संजय जाधवांचे कान : ‘उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस...’

...तर शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना परत आणणार!

अजित पवार म्हणाले, जूनमध्ये गेलेलं सरकार पुन्हा आणण्यासाठी काय आखणी केली पाहिजे, मताची विभागणी कशी रोखायची, याचा विचार आणि प्रयत्न करत आहोत. आपण आता त्या गटाकडून निवडून येऊ शकत नाही आणि महाविकास आघाडी पुन्हा येईल अशी परिस्थिती झाली की, गेलेले अनेकजण परत येतील. आम्ही सगळ्यांचा विचार करणार नाहीत. पण इलेक्टीव्ह मेरीट असणाऱ्यांचा विचार नक्की करू असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in