Ajit Pawar On Sushma Andhare: अजितदादांनी अंधारेंना फटकारलं; म्हणाले,'' पवारांपेक्षा ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर...''

Maharashtra Politics: ''त्या ज्या पक्षाचं काम बघताहेत, ज्या पक्षासाठी बाबा रे, दादा रे, मामा रे करत सभा घेताहेत...''
Ajit Pawar On Sushma Andhare
Ajit Pawar On Sushma AndhareSarkarnama

Pune News: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर भावनिक होत रडल्या होत्या. तसेच त्यांनी व्यासपीठावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पवारांकडे तक्रार केली होती. आता याचवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अंधारेंना फटकारलं आहे.

अजित पवार(Ajit Pawar) यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सुषमा अंधारेंनी शरद पवारांकडे केलेल्या तक्रारीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

पवार म्हणाले, सुषमा अंधारे कुठल्या पक्षाच्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या ना. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत ना. मग साताऱ्यात शरद पवारांसमोर भावनिक होण्यापेक्षा ते रडण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघताहेत, ज्या पक्षासाठी बाबा रे, दादा रे काका रे,मामा रे करत सभा घेताहेत. त्यांनी अजित पवारांचं नाव घेण्यापेक्षा त्या ज्या पक्षात आहेत. त्याच्या विरोधीपक्षाच्या नेत्यांना सांगायला हवं होतं ना असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

Ajit Pawar On Sushma Andhare
Solapur News : अजितदादा गेल्या सहा महिन्यांत आम्हाला कधीही भेटले नाहीत; पण... : बावनकुळेंनी टाकली ठिणगी

विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या इतकाच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यालाही अधिकार असतात. त्यामुळे तिकडं उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)समोर रडला असता आणि त्यांच्या विरोधीपक्षनेते असलेल्या अंबादास दानवेंना सभागृहात हा मुद्दा मांडायला सांगितला असता ते जास्त योग्य ठरलं असतं असा टोलाही अजित पवारांनी सुषमा अंधारेंना लगावला.

अंधारे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले. शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी पवारांनी कशी मदत केली याचा एक किस्सा सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या आणि ढसाढसा रडल्या.

Ajit Pawar On Sushma Andhare
BJP NEWS : जयंतराव, कर नाही, तर डर कशाला ? ; ED च्या नोटीसवरुन भाजपनं डिवचलं ; भावनिक कार्ड सोडा..

अंधारे म्हणाल्या, इथं राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टीपण्णी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता असंही अंधारे म्हणाल्या होत्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com