Ajit Pawar on Sawant's Statement: अरविंद सावंतांच्या गौप्यस्फोटातील 'रिक्षावाला' शब्द पवारांचा नाहीच; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : मोदींची पदवी पाहून २०१४ ला त्यांना निवडून दिलं का?
Ajit Pawar News, Jalna
Ajit Pawar News, JalnaSarkarnama

Ajit Pawar on Arvind Sawant Statement : महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी २०१९ ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं. पण शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं विधान केलं होतं.

पण या 'रिक्षावाला' शब्दाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवार(Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद सावंत यांच्या गौप्यस्फोटासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पवार म्हणाले, शरद पवार साहेबांनी कायमच सर्वांचा आदर केला आहे. त्यामुळे रिक्षावाला हा शब्द पवारांचा नाही. तो माझा शब्द असल्याचं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे असंही पवार म्हणाले.

Ajit Pawar News, Jalna
Maharashtra News: ''२०१९ला मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी शिंदेंचंच नाव दिलेलं,पण पवारांनी..''; 'या'खासदाराचा गौप्यस्फोट

मोदींची पदवी पाहून २०१४ ला त्यांना निवडून दिलं का?

अजित पवारांनी सध्या सुरु असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)च्या पदवीवरुन रंगलेल्या राजकारणावर अजित पवारांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, २०१४ साली नरेंद्र मोदी यांची पदवी पाहून लोकांनी निवडून दिलं होतं का? त्यांनी २०१४ साली स्वत:चा करिष्मा निर्माण केला होता.

तसेच जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्वस्व श्रेय नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. लोकशाहीत बहुमताचा आदराला महत्व आहे. देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५ चं बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे असंही पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar News, Jalna
Siddaramaiah News : काँग्रेसच्या सिद्धरामय्यांविरुध्द लढण्यास येडियुरप्पांच्या मुलाचा नकार; खासदार प्रतापसिंहांसाठी आरएसएस आग्रही

अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले होते?

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मोठा २०१९ साली महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळचा संदर्भ देत मोठं विधान केलं आहे. सावंत म्हणाले, २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचंच नाव दिलं होतं.

पण शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं विधान केल्याचं सावंत म्हणाले होते.

असं असूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी गळ घातली. आणि हे शिवधनुष्य तुम्हांलाच घ्यावं लागेल असं शरद पवार म्हणाले असा धक्कादायक खुलासा खासदार सावंत यांनी केला आहे. आता सावंत यांच्या दाव्यानंतर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com