एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा: पण शिवसेनेला मत देणार नाही

Rajyasabha Election 2022| AIMIM| एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल रात्री १ वाजता ट्रायडंट हाँटेलमध्ये येऊन शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली.
Rajyasabha Election 2022|  AIMIM|
Rajyasabha Election 2022| AIMIM|

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी आज (१० जून) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांचीही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. एआयएमआयएम’ची दोन मते शिवसेनेसाठी अडचणीची ठरणार असल्याचे म्हटले जात असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल रात्री १ वाजता ट्रायडंट हाँटेलमध्ये येऊन शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला.

राज्यातील राज्यसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करताना खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इमरान प्रतापगढी यांना मतदान करण्याचे सांगितलं आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असंही इम्तियाज जलील म्हटले आहे

Rajyasabha Election 2022|  AIMIM|
झेडपीचे सरस प्रदर्शन म्हणजे केदार गटाचा कार्यक्रम; विरोधकांचा आरोप !

''भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत. राज्यसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेसोबत आमचे राजकीय, वैचारीक मतभेद कायम असतील,'' असे ट्विट करत इम्तियाज जलील यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट केली आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये “आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकाससाठी आम्ही काही अटीशर्थी ठेवल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचलावीत आमि मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी एमआयएमने केली आहे.''

राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएमची मते हवी असल्यास तशी जाहीर मदत महाविकास आघाडीने मागावी, अशी भूमिका एमआयएमनेच अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी घेतली होती. त्यानंतर एमआयएमने कॉंग्रेसच्या इमरान प्रतापगढी यांना पाठिंबा दर्शवला आहे. आपल्या कोणत्याही आमदाराचे मत बाद होऊ नये यासाठी नये म्हणून प्रत्येक पक्ष खबरदारी घेतली आहे. मतदान कशा पद्धतीने करायचं आणि दुसऱ्या पसंतीची मते देताना कोणती काळजी घ्यायची, हे आमदारांना समजावून सांगण्यात आले. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होण्याच्या शक्यता असल्याने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in