कृषी विषय राज्याचा की केंद्राचा ; प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न

कृषी विषय राज्याचा की केंद्राचा ; प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न
rakash Ambedkarsarkarnama

मुंबई : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर अनेकांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''शेतकरी नेत्यांनी हे आंदोलन यशस्वी केले,'' ते माध्यमांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, ''कृषी कायदे (Agriculture act) रद्द करावे ही शेतकऱ्यांची मागणी होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हे कायदे रद्द करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न केंद्राचा आहे की राज्याचा याबाबत निर्णय दिला असता तर शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले नसते,''

''माझ्या माहितीनुसार कृषी हा विषय राज्याचा आहे. पंतप्रधान मोदींवर कायदा रद्द करण्याची नामुष्की आली. सुप्रीम कोर्टाने कृषी हा विषय राज्याचा की केंद्राचा आहे हे स्पष्ट करावे. शेतकऱ्यांचे जाणते राजे समजणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने येत्या अधिवेशनात कृषी कायदा रद्द करावा. माझ्या माहितीनुसार कृषी हा विषय राज्याचा आहे. पंतप्रधान यांच्यावर कायदा रद्द करण्याची नामुष्की आली आहे. शेतकऱ्यांचे जाणते राजे समजणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने येत्या अधिवेशनात कृषी कायदा रद्द करावा''

rakash Ambedkar
बालहट्टासाठी मेट्रो का रोखली ; साटम यांचा ठाकरेंना सवाल

''महाराष्ट्राच्या माजी पोलिस आयुक्तांना फरार घोषित करण्यात आले आहे, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. राज्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे,'' असे आंबेडकर म्हणाले. गेल्या तेरा दिवसापासून सुर असलेल्या संपाबाबत ते म्हणाले, ''आताच्या सरकारला एसटीचे खाजगीकरण व्हावे असे वाटते. प्रायव्हेट कंत्राटदारांना फायदा व्हावा, यासाठी खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला जात आहे,''

समीर वानखडे हे जातीबाबत बरोबर बोलत आहेत..

एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे बाबत आंबेडकर म्हणाले, ''समीर वानखडे जाती बाबत बरोबर बोलत आहेत. जातपडताळणी पुढे हा निर्णय गेला आहे. समीर वानखडे यांनी मी वयात आल्यानंतर मी मुस्लिम धर्म स्वीकारलेला नाही असे सांगितले आहे. वय झाल्यानंतर मुलाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला पण मुलाने वडिलोपार्जित धर्म स्वीकारला आहे. समीर वानखडे यांचे जातीचे सर्टिफिकेट ग्राह्य आहे असे दिसते. समीर वानखडे यांच्या जातीच्या अडचणी वाढतील असे मला वाटत नाही,''

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in