एनसीबीच्या मुख्यालयात वानखेडे पोचले पण मागील दाराने!

क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे अडचणीत आले आहेत.
Sameer Wankhede
Sameer WankhedeFile Photo

मुंबई : क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे अडचणीत आले आहेत. अखेर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याचे एनसीबीने जाहीर केले होते. यासाठी वानखेडे तातडीने दिल्लीत दाखल झाले होते. परंतु, वानखेडे हे मागील दाराने एनसीबीच्या मुख्यालयात हजर झाले होते. मुख्यालयातून दोन तासांनंतर ते बाहेर पडले असून, मुंबईकडे रवाना झाले आहेत.

दिल्लीतील आर.के.पुरम भागातील एनसीबीच्या मुख्यालयात वानखेडे हे आज दाखल झाले. मात्र, पुढील दार टाळून मागील दाराने वानखेडे यांनी मुख्यालयात जाणे पसंत केले. एनसीबीचे महासंचालक एस.एन.प्रधान यांची वानखेडे यांनी भेट घेतल्याचे समजते. एनसीबीकडून आढावा बैठकीसाठी वानखेडेंना बोलावल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात त्यांची चौकशी झाल्याचे समोर येत आहे. वानखेडे तब्बल दोन तासांनी एनसीबीच्या मुख्यालयातून बाहेर पडले. ते आता मुंबईला रवाना झाले आहेत.

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांना काल (ता.25) सायंकाळी तातडीने दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. याचबरोबर एनसीबीचे पथक दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह दोन निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. वानखेडेंवरील आरोपांची चौकशी हे पथक करणार आहे. वानखेडे हे काल दिल्लीत दाखल झाले आहेत.

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह (Gyaneshwar Singh) यांनी चौकशी सुरूच झाला नसल्याचा दावा आज केला. ज्ञानेश्वरसिंह यांनी वानखेडेंची चौकशी सुरू झाल्याचे काल म्हटले होते. आज मात्र, त्यांनी उलट भूमिका घेत ही चौकशी सुरूच झाली नसल्याचे म्हटले आहे. वानखेडेंच्या चौकशीबाबत ज्ञानेश्वरसिंह यांना आज विचारणा केली असता त्यांनी वेगळीच माहिती दिली. ते म्हणाले की, मी कुणालाही आज बोलावले नव्हते. मला जर त्यांची चौकशी करायची असती तर मी त्यांना कॉल केला असता.

Sameer Wankhede
वानखेडेंना अडचणीत आणणाऱ्या प्रभाकर साईलचा आणखी एक गौप्यस्फोट

दिल्लीत पोचल्यानंतर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एनसीबीने चौकशीसाठी बोलावले नसल्याचा खुलासा केला होता. मला चौकशीसाठी समन्स बजावलेले नसून, वेगळ्याच कामासाठी बोलावले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्यावरील आरोप निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वानखेडे हे दिल्लीच्या एनसीबीच्या कार्यालयात पोचले असून, वानखेडेंची चौकशी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Sameer Wankhede
भाजपमधून येणाऱ्या नेत्यांसाठी काँग्रेसने लावला हाऊसफुलचा बोर्ड!

वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, या प्रकरणी उपमहासंचालकांनी दिलेला अहवाल एनसीबीच्या संचालकांना मिळाला आहे. त्यांनी या प्रकरणी दक्षता विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी आताच सुरू झाली असून, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल लगेच टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com