Jayant Patil- Ajit Pawar & Devendra Fadnavis
Jayant Patil- Ajit Pawar & Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Budget 2023 : जयंत पाटलांनंतर अजितदादांचाही फडणवीसांना चिमटा; म्हणाले,'' त्यांना राग येत नाही,ते...''

Political News : तुम्ही आज आक्रमक दिसत नाहीत. चिडलेले दिसत नाहीत.

Maharashtra Politics: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला बुधवारी ( दि.८) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईच्या विरोधकांच्या आक्रमक मागणीने झाली. यानंतर काहीच वेळात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांना चिमटे काढले.यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) धुलिवंदनाच्या एका कार्यक्रमावेळी राजकीय बदला घेण्याच्या विधानावरुन पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी आम्ही मागील वेळी विधानसभेत सांगितलं होतं की, खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला. त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ. पण आता आमचा बदला हाच आहे की, आम्ही त्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात या कुणाबद्दल कोणतीही कटुता नाही असं विधान केलं होतं. यावरुनच विधानसभेत अजित पवारांनी फडणवीसांना कोपरखळी मारली.

Jayant Patil- Ajit Pawar & Devendra Fadnavis
Chhatrapati Sambhajinagar: नामांतराचा वाद पेटला; राष्ट्रवादीचे ५० पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार?

नेमकं काय घडलं?

विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत हिंदू देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या बाबतीत गैरव्यवहार घडत असल्याचा आरोप केला. त्यावर कारवाई करण्यात येईल का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी याचा तपास नक्कीच केला जाईल. वक्फ कायद्यानुसार कारवाईची गरज असेल तर तशा सूचनाही दिल्या जातील असं उत्तर दिलं.

जयंतराव, मला कधीच राग येत नाही..!

जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आज आक्रमक दिसत नाहीत. चिडलेले दिसत नाहीत. एवढा घोटाळा समोर मांडला जाऊनही तुमच्या चेहऱ्यावर राग दिसत नाही.तुम्हाला राग आलेला नाही असा टोला फडणवीसांना लगावला. यावर फडणवीसांनी मिश्किलपणे मला राग येतच नाही, जयंतराव असं म्हणताच सभागृहात हशा पिकला. यानंतरही जयंत पाटील यांनी थेट विधानसभा अध्यक्षांना मिश्किलपणे विनंती करत याची नोंद घेतली जावी असा टोला लगावला आहे.

Jayant Patil- Ajit Pawar & Devendra Fadnavis
Nagaland Government : मोठी बातमी ; राष्ट्रवादी भाजपसोबत सत्ता स्थापन करणार?

यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांच्या कालच्या वक्तव्याचा संदर्भ घेत राग नाही, ते आता बदला म्हणून सगळ्यांना माफ करत सुटलेत असा टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com