संतापजनक : गावातील टपोरी पोरांच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Suicide Hanging : ९ वी मध्ये शिकणारी अत्यंत हुशार विद्यार्थीनी
Siddhi Bhite
Siddhi BhiteSarkarnama

वालचंदनगर (इंदापूर) : गावातील टिंगल टवाळी करणाऱ्या मुलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बोरी (ता.इंदापूर) येथील १५ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनींने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धी गजानन भिटे (वय १५) असे मृत विद्यार्थींनीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली. यातील एक जण अल्पलवयीन आहे.

याबाबात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिद्धी गावातीलच हायस्कुलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत होती. शाळेत देखील ती अत्यंत हुशार होती. शाळेमध्ये ये-जा करत असताना मागच्या काही दिवसांपासून गावातील तिघे जण टिंगल टवाळ करुन सातत्याने तिची छेड काढून तिला नाहक त्रास देत होते. सिद्धीने या घटनेचे आपल्या घरी माहिती दिल्यानंतर सिद्धीचे वडिल गजानन यांनी संबंधित तिघांच्या घरी जावून त्यांच्या आई-वडिलांना छेडछाडच्या प्रकाराबद्दल यापूर्वी अनेकवेळा कल्पनाही दिली होती.

Siddhi Bhite
चंद्रकांतदादांची नवी खेळी; दिवंगत आमदाराच्या पत्नीला भाजपकडून लढण्याची ऑफर

मात्र यानंतही छेडछाडीचा प्रकार थांबला नसल्याने बुधवारी (ता.१२) रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास सिद्धीने घरातील पत्र्याच्या लोखंडी अॅगलला साडीच्या साहय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहिली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीचे वडिल गजानन पांडुरंग भिटे (वय ४२) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Siddhi Bhite
महाराष्ट्र हादरला! रुग्णालयाच्या गोबरगॅस टाकीत १ भ्रूण आणि ५ कवट्या

या तक्रारीवरुन पोलिसांनी गणेश उर्फ जी.के.संतोष कुचेकर (वय २४), यश अरुण गरगडे (वय १८,रा.दोघे बोरी) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर अन्य एक जण अल्पवयीन आहे. याप्रकरणी पुढील तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in