आघाडीमधील मंत्र्यानेच केली सरनाईकांची गोची; मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी फोडला निर्णय

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
आघाडीमधील मंत्र्यानेच केली सरनाईकांची गोची; मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी फोडला निर्णय
Pratap Sarnaik Sarkarnama

मुंबई : नुकत्याच पार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, सरकारकडून सरनाईक यांच्या या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी महानगरपालिकेला आदेश देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. मात्र सरकारकडून दाखविलेल्या मेहेरबानीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक या दोघांनीही मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

त्यानंतर प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आज पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले, त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आभार मानले. तसेच ठाणे महापालिकेचे तत्कानिल आयुक्त आर ए. राजीव यांच्यावर आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यावर सडकून टीका केली. तसेच एक इंच जरी बांधकाम अनधिकृत ठरले तर आमदारकीचा राजीनामा देईन असे आव्हान दिले आहे.

महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनेच केली बातमी लीक

यासोबतच सरनाईक यांनी यावेळी महाविकास आघाडीतील एका मंत्र्यानेच जाणीपूर्वक विषय मंत्रिमंडळ बैठकीत येण्याआधी वृत्तवाहिनीला बातमी दिली असा आरोप केला. पण त्यालाही न जुमानता हे प्रकरण मंजूर केल्याबद्दल त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

Pratap Sarnaik
२१ कोटींची मेहेरबानी; सरनाईकांसाठी थेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नेमके काय आहे प्रकरण?

५ मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेने प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला ३ कोटी ३३ लाखांचा दंड ठोठावला होता. यापैकी २५ लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. मात्र उर्वरित ३ कोटी ८ लाख रुपये दंडाची रक्कम आणि त्यावरील १८ टक्के दराने १ कोटी २५ लाख रुपयांची व्याजाची रक्कम सरनाईक यांच्याकडून येणे बाकी होती. पण संबंधित रक्कम २१ कोटी रुपये होती, असा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा आहे.

Pratap Sarnaik
जनरेट्यापुढे सरकार नमलं! कमलापूरमधील हत्तींबाबत सरकारची मोठी घोषणा

काय म्हणाले होते किरीट सोमय्या?

ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका करताना भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, ठाणे येथील विहंग गार्डनचे ५ मजले अनधिकृत बांधकाम केले. २०१२ मध्ये पाडण्याचे आदेश होते, मात्र तरीही ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in